scorecardresearch

नाशिक: सावजाच्या शोधात बिबट्या विहीरीत

सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे हा प्रकार घडला. स्थानिकांनी वनविभागाला याविषयी माहिती दिल्यानंतर पथकाने बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढले.

नाशिक: सावजाच्या शोधात बिबट्या विहीरीत
सावजाच्या शोधात बिबट्या विहीरीत

सावजाच्या शोधात असलेला बिबट्या विहीरीत पडला. सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे हा प्रकार घडला. स्थानिकांनी वनविभागाला याविषयी माहिती दिल्यानंतर पथकाने बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढले.रामनगर येथील शिवाजी मंडले यांच्या शेतातील विहीरीत दीड ते दोन वर्षे वयाचा बिबट्या पडला.

हेही वाचा >>>नाना पटोलेंची काँग्रेसला सावरण्यासाठी तर सत्यजीत तांबेंची सहानुभूतीसाठी धडपड; नाशिक पदवीधर मतदारसंघात चुरस

पश्चिम वनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक पवार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणगावचे वनपाल एस. पी. झोपे, वनरक्षक किरण गोरडे , वसंत आव्हाड यांच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मादी बिबट्याला सुरक्षितरित्या विहीरीतून बाहेर काढले. याविषयी वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा जाधव यांनी माहिती दिली. बिबट्या पाण्यात असल्याने त्याला काही काळ निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल. सध्या त्यास मोहदरी येथील वन उद्यान येथे ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 17:48 IST

संबंधित बातम्या