scorecardresearch

Premium

नाशिकरोड रेल्वे स्थानकात लवकरच उद्वाहन, सरकता जिना

नाशिकरोड रेल्वे स्थानकातील अतिशय वर्दळीच्या फलाट क्रमांक दोन आणि तीनसाठी नववर्षात उद्वाहन व सरकता जिना (एस्केलेटर) कार्यान्वित होत आहे.

escalators Nashik Road railway station
नाशिकरोड रेल्वे स्थानकात लवकरच उद्वाहन, सरकता जिना (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नाशिक – नाशिकरोड रेल्वे स्थानकातील अतिशय वर्दळीच्या फलाट क्रमांक दोन आणि तीनसाठी नववर्षात उद्वाहन व सरकता जिना (एस्केलेटर) कार्यान्वित होत आहे. जेणेकरून प्रवाश्यांना बाहेर पडण्यासाठी सध्या करावा लागणारा द्राविडी प्राणायाम काही अंशी कमी होईल. शिवाय वृद्ध व अपंग प्रवाश्यांना या फलाटावर सहजपणे ये-जा करणे सुकर होणार आहे.

जवळपास १० महिन्यांपासून प्रगतीपथावर असणारे हे काम लवकरच पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे. वार्षिक ६० कोटींहून अधिकचे उत्पन्न मिळवणाऱ्या नाशिकरोड रेल्वे स्थानकाचा ए १ गटात समावेश होतो. दिवसभरात या स्थानकावर १०५ हून अधिक रेल्वेगाड्या थांबतात. या ठिकाणी फलाट क्रमांक एकवर उद्वाहन आहे. तर फलाट क्रमांक चारवर एक रॅम्प आहे. मुख्य पुलास जोडणारा फलाट क्रमांक दोन, तीनवर जिना आहे. या ठिकाणी कुठलीही यांत्रिक व्यवस्था नव्हती. फलाट क्रमांक एकची लांबी कमी आहे. त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या सर्वाधिक रेल्वेगाड्या फलाट क्रमांक दोनवर येतात. तसेच मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या फलाट क्रमांक तीनवर येतात. म्हणजे सर्वाधिक वर्दळीचे हे फलाट आहेत. फलाट क्रमांक दोन व तीनवर मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. मुख्य पुलाला जोडण्यासाठी उद्वाहन व सरकत्या जिन्याची आवश्यकता मांडली जात होती. त्या अनुषंगाने काम हाती घेतले गेले. फलाटावरून वरील पुलास जोडणारी उद्वाहन आहे. जानेवारीपर्यंत हे काम पूर्णत्वास जाणार असल्याचे रेल्वेच्या सूूत्रांकडून सांगण्यात आले.

Wardha Yavatmal Nanded first train service from Kalamba to Wardha started
१५ वर्षांची प्रतीक्षा संपली; कळंब– वर्धा मार्गावर धावली पहिली रेल्वे
Itwari Railway Station To Be Renamed After Subhash Chandra Bose
नागपूर: इतवारी रेल्वे स्थानकाचे नामकरण आता या नावाने ओळखले जाणार
Transformation of 20 railway stations Prime Minister Modi will perform Bhumi Pujan tomorrow through television system
२० रेल्वे स्थानकांचा कायापालट; पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्या भूमिपूजन
Dombivli railway station staircase
डोंबिवली रेल्वे स्थानकातील जिना तोडल्याने प्रवाशांची फरफट

हेही वाचा – आता थांबायचं नाही, हक्कावर गदा येत असेल तर लढायचं – छगन भुजबळ

हेही वाचा – प्रकाश आंबेडकर म्हणाले, “तीन डिसेंबरनंतर राज्यात दंगल…”

मागील कुंभमेळ्यात नाशिकरोड रेल्वे स्थानकावर विविध सोयी सुविधांची उभारणी करण्यात आली. स्थानकावर पूलही त्याचा एक भाग होता. आता आगामी कुंभमेळ्यापूर्वी फलाटावरून सहजपणे ये-जा करण्याची व्यवस्था या निमित्ताने आकारास येत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lift and escalators at nashik road railway station soon ssb

First published on: 28-11-2023 at 14:05 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×