नाटकाला भरभरून दाद देतानाच राज्यातील नाटय़ चळवळीला लेखन, सादरीकरण, तंत्रज्ञ आदी माध्यमांतून भरभक्कम बळ देणारे ठिकाण, अशी खरेतर नाशिकची पूर्वापार ओळख. प्रदीर्घ काळापासून रुजलेली ही ओळख समर्थपणे पुढे नेण्यासाठी धडपडणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘लोकसत्ता’चीही त्यांना साथ लाभत आहे. त्याच अनुषंगाने आयोजित ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची नाशिक विभागीय प्राथमिक फेरी चार व पाच ऑक्टोबर रोजी होत आहे.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेत आयरिस प्रोडक्शन व स्टडी सर्कल हे टॅलेण्ट पार्टनर आहेत. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष. त्यामुळे महाविद्यालयांकडून मिळणारा प्रतिसादही जवळपास दुपटीपर्यंत पोहचला आहे. त्यात ग्रामीण भागातील तरुणाईचा सहभाग ठळकपणे अधोरेखीत होत आहे.
महाकवी कालिदास कला मंदिरात पहिल्या मजल्यावरील नाटय़ परिषदेच्या सभागृहात रविवारी सकाळी साडे नऊ वाजता प्राथमिक फेरीला सुरूवात होणार आहे. मागील वर्षी लोकांकिका स्पर्धेत ११ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. यंदा ही संख्या १८ ंपर्यंत विस्तारली आहे. गतवेळी नाशिकच्या क. का. वाघ परफॉर्मिग आर्टस महाविद्यालयाच्या ‘हे राम’ या एकांकिकेने महाअंतिम फेरीत धडक दिली होती. आपल्यातील कलागुण राज्यस्तरापर्यंत पोहचविण्यासाठी पुन्हा एकदा नाशिक विभागातील सर्व संघ नव्या दमाने तयारीला लागले आहेत. ही केवळ एक स्पर्धा नाही. तर, या स्पर्धेच्या माध्यमातून नाटय़-चित्र क्षेत्राची कवाडे अधिक मोठय़ा स्वरूपात प्रत्येकासाठी खुली होणार आहेत. विद्यार्थ्यांचे कलागुण जोखून त्यांना मनोरंजन क्षेत्रात कामाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयरिश प्रोडक्शनचे दीपक करंजीकर व विद्या करंजीकर हे निरीक्षक
प्राथमिक फेरीसाटी उपस्थित राहणार आहेत. दीपक हे नाटय़-चित्र क्षेत्रात कार्यरत असून त्यांची ‘पुढचे पाऊल’ ही मालिका सध्या गाजत आहे. प्रेमाच्या गावा जावे, गांधी ते सावरकर, या नाटकांमध्ये त्यांनी काम केले आहे. विद्या यांनी ‘जोगवा’ चित्रपटात भूमिका साकारली. या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करण्यात येईल. स्पर्धेचे राज्यात विभागवार आयोजन करण्यात अस्तित्व या संस्थेचे सहकार्य मिळाले आहे. प्राथमिक फेरीसाठी रेडिओ पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफएफ आणि संपूर्ण स्पर्धेचे टेलिव्हिजन पार्टनर झी मराठी आहे.
स्पर्धेत सहभागी संघांची संख्या वाढल्यामुळे दोन दिवसात प्राथमिक फेरी होईल. गेल्यावेळी प्रमाणे तरूणाईच्या सळसळत्या उत्साहाचे प्रतिबिंब स्पर्धेत उमटणार असून वैविध्यपूर्ण विषयांची मांडणी करण्याचा प्रत्येक संघाचा प्रयत्न नक्कीच दिसणार आहे.
रविवारी सादर होणाऱ्या एकांकिका
* ‘एमईटी’चे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय – भारत माझा देश आहे *  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ – एका गाढवाची गोष्ट *  क. का. वाघ महाविद्यालयाचे परफॉर्मिग आर्टस, नाटय़ विभाग) – जाने भी दो यारो *  गु. मा. दां. कला आणि भ. वा. वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर – सेझवरील अंधार
* ना. शि. प्र. मंडळाचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय, इगतपुरी – तो मारी पिचकारी, सनम मेरी प्यारी
* के. आर. टी. कला आणि वाणिज्य महाविद्यालय, वणी – मिमांसा ल्ल के. पी. जी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, इगतपुरी – जिवाची मुंबई *  शताब्दी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड रिसर्च, सिन्नर – टिळक इन ट्वेन्टीफस्ट सेंच्युरी *  न. ब. ठाकूर विधी महाविद्यालय – द परफेक्ट ब्लेंड

सोमवारी सादर होणाऱ्या एकांकिका
* भिकुसा यमासा क्षत्रिय वाणिज्य महाविद्यालय – दोघी ल्ल के. टी. एच. एम. महाविद्यालय – व्हॉट्स अ‍ॅप
* शेठ ब. ना. सारडा विद्यालय व आरंभ महाविद्यालय, सिन्नर – वादळवेल ल्ल म. स. गा. महाविद्यालय, मालेगाव – एक अभियान ल्ल कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे महाविद्यालय, सटाणा – बाबा ४२०, शेंडीवाला ल्ल कै. बिंदू रामराव देशमुख कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालय – कोलाज् *  लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय – जंगल *  क. का. वाघ महाविद्यालयचे परफॉर्मिग आर्टस, संगीत विभाग)- त्रिकाल *  हं. प्रा. ठा. कला आणि रा. य. क्ष. विज्ञान महाविद्यालय- जेनेक्स