नाशिक – हिवाळा हा शैक्षणिक सहलींचा हंगाम असल्याने जिल्ह्यातील अनेक शाळांकडून शैक्षणिक सहलींचे नियोजन केले जात आहे. दुसरीकडे, राज्य परिवहन तसेच खासगी वाहनांमधील बिघाडामुळे होणारे अपघात लक्षात घेता, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सहलींसाठी बसचा वापर करताना वाहकांची शारीरिक स्थिती योग्य असल्याची तसेच बसची तपासणी करून घ्यावी, अशी सूचना केली आहे.

हेही वाचा >>> विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ‘गुरूशाला’ : आदिवासी विकास विभागाचा उपक्रम

ayurvedic experts to hold seminar on garbhavigyan event at iit bombay
आयआयटी प्रांगणात ‘गर्भविज्ञान’ धडे; उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून विरोध
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Mumbai Municipal Corporation , Class two Test,
मुंबई : स्वयंअध्ययनातील निपुणतेसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांची चाचणी
Education Institute Quality, Education Institute ,
अशा वातावरणात कशी वाढणार शिक्षणाची गुणवत्ता?
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
Higher education , skill courses, guidelines UGC,
उच्च शिक्षणात आता कौशल्य अभ्यासक्रमांवर भर; ‘यूजीसी’कडून मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना

सध्या हिवाळ्यामुळे उत्साहाचे वातावरण असल्याने थंड हवेचा आनंद निसर्गरम्य ठिकाणी घेण्यासाठी अनेक जण सहलींचे आयोजन करत आहेत. यंदा पाऊस अधिक प्रमाणात झाला असताना काही दिवसांपासून थंडीचा कडाकाही जाणवू लागला आहे. सर्वत्र आल्हाददायक वातावरण असल्याने शैक्षणिक सहलींसाठी हा कालावधी योग्य मानला जात आहे. काही वर्षांपूर्वी अलिबाग येथे झालेल्या अपघातामुळे शैक्षणिक सहलींवर गदा आली होती. शिक्षण विभागाने शैक्षणिक सहलींना परवानगी नाकारली होती. त्यातच करोनामुळे सर्व सहलींवर बंधने आली होती. वातावरण निवळताच इतर सहली नेहमीप्रमाणे सुरू झाल्या असल्या तरी शैक्षणिक सहलींसाठी फारसे कोणी पुढाकार घेत नव्हते. राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी पर्यटन संचालनालयाच्या वतीने शालेयस्तरावर शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या वतीने करण्यात आल्या. त्यामुळे शाळांकडून शैक्षणिक सहलींचे नियोजन करण्यास सुरुवात करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास सुखरूप तसेच सुरक्षित होण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा

याविषयी शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी माहिती दिली. नाशिक जिल्हातील विविध शाळांकडून शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात येत आहे. सहलीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून शाळांना देण्यात येणारे वाहन सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी, नादुरूस्त व सुस्थितीत नसलेली वाहने सहलीसाठी देण्यात येऊ नयेत, सहलीसाठी देण्यात येणाऱ्या बसवरील चालक निर्व्यसनी असावा, आदी सूचना पाटील यांनी केल्या आहेत. यासंदर्भात पाटील यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला पत्र दिले आहे.

शाळांची अनुत्सुकता

शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात विद्यार्थ्यांची काळजी हा संवेदनशील मुद्दा असल्याने अनेक शाळा अनुत्सुक असतात. नेहमीच्या अभ्यासाच्या दगदगीतून शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सुटका होते. त्यांना वेगळ्या विश्वात नवीन काहीतरी अनुभवण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करुन काही शाळा शैक्षणिक सहलींसाठी आग्रही असतात. अशा सहलींचे आयोजन करताना राज्य परिवहनची साथ महत्वाची असते.

Story img Loader