scorecardresearch

Nashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट! दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित

Nashik ST Bus Fire: ऑक्टोबर महिन्यातच नाशिकजवळील तपोवन येथे बसला आग लागून झालेल्या भीषण दुर्घटनेत १३ जणांना मृत्यू झाला होता.

Nashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट! दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित
Nashik ST Accident News: नाशिक सिन्नर महामार्गावर एसटी अपघात (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

ST Accident on Nashik Sinnar Highway: नाशिकमध्ये एका एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. नाशिक शहरापासून सहात ते आठ किमी अंतरवर झालेल्या या अपघातामध्ये गाडीमधील सर्व प्रवासी सुदैवाने बचावले असले तरी या अपघातात दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. स्थानिकांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याने या अपघातात एसटीमधील प्रवासी वाचले. मात्र अपघातामध्ये ८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. नाशिक-सिन्नर महामार्गावर हा एसटी अपघात झाला.

या अपघाताची माहिती मिळताच नाशिक महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ऑक्टोबर महिन्यातच नाशिकजवळील तपोवन येथे बसला आग लागून झालेल्या भीषण दुर्घटनेत १३ जणांना मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा असा अपघात झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र आजच्या एसटी बसला आग का लागली यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 16:01 IST

संबंधित बातम्या