Malegaon Central : मुस्लीम समाजाचं वर्चस्व असलेल्या मालेगाव मध्य मतदारसंघाची पार्श्वभूमी काय आहे?

मालेगाव मध्य या मतदारसंघात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. तसंच मोहम्मद इस्माइमल खलीक हे तिथले आमदार आहेत.

Malegaon Central Constancy
मालेगाव मध्य मतदारसंघ हा मुस्लीम बहुल आहे. (फोटो सौजन्य-एक्स अकाऊंट)

Malegaon Central : मालेगाव (मध्य) विधानसभा मतदारसंघ – ११४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मालेगाव (मध्य) मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.८ ते २० आणि २६ ते ६५ यांचा समावेश होतो. मालेगाव (मध्य) हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे मुफती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक हे मालेगाव (मध्य) विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान ( Malegaon Central ) आमदार आहेत.

मालेगावची पार्श्वभूमी

मालेगाव हे राज्यातलं संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी मुस्लिमबहुल वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. करोना काळात मालेगाव पॅटर्नचीही चांगलीच चर्चा रंगली होती. सुरुवातीपासून हा मतदारसंघ ( Malegaon Central ) संवेदनशील मानला जातो. या ठिकाणी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर राहतो. मोहम्मद इस्माइल अब्दुल खलिक हे या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत. AIMIM ने त्यांना २०१९ मध्ये तिकिट दिलं होतं. या तिकिटावर ते निवडून आले आहेत. मोहम्मद इस्माइल खलिक हे मुस्लिम असले तरीही मराठी राजकारणी ( Malegaon Central ) आहेत. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल म्हणजेच AIMIM या पक्षाचे ते नेते आहेत. असदुद्दीन ओवैसी यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.

मालेगाव मध्य मतदारसंघात २००९ ला काय स्थिती होती?

मुफ्ती मोहम्मद इस्माइल ए. खलीक जनथीपाठी संरक्षण समिती चे उमेदवार होते. त्यांना ७१ हजार १५७ मतं पडली. त्यांनी शेख रशीद हाजी शेख शफी यांचा पराभव केला. त्यांना ५३ हजार २३८ यांचा पराभव केला.

२०१४ मध्ये काय घडलं?

शेख आसिफ राशीद हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. त्यांना ७५ हजार ३२६ मतं मिळाली. तर मुफ्ती मोहम्मद इस्माइल कास्मी हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढले मात्र त्यांना ५९ हजार १७५ मतं मिळाली. त्यांचा पराभव झाला. मलिक मोहम्मद युनुस हे एमआयएमच्या तिकिटावर लढले त्यांना २१ हजार ५० मतं मिळाली.

२०१९ च्या निवडणुकीत काय घडलं?

मोहम्मद इस्माईल खलीक हे एमआयएमच्या तिकिटावर निवडून आले. त्यांना १ लाख १७ हजार २४२ मतं मिळाली. तर आसिफ शेख राशीद हे काँग्रेसच्या तिकिटावर लढले. त्यांना ७८ हजार ७२३ मतं मिळाली. २०१९ च्या निवडणुकीत एमआयएमच्या तिकिटावर निवडून आले. तेव्हापासून या मतदारसंघात एमआयएमचं वर्चस्व आहे. खलीक हे २०१४ चा अपवाद वगळता मागची दहा वर्षे आमदार आहेत. मालेगाव मध्य ( Malegaon Central ) हा तसाही मुस्लिम बहुल भाग आहे. तसंच अत्यंत संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जातं. करोना काळातला मालेगाव पॅटर्नही गाजला होता.

हे पण वाचा- नाशिक : मालेगाव स्टँड परिसरातील वाहतूक मार्गात बदल

मालेगावला भुईकोट किल्ल्यामुळे ऐतिहासिक महत्व

मालेगाव येथील भुईकोट किल्ल्यामुळे या शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. नाशिक, धुळे, जळगाव, चाळीसगाव, छत्रपती संभाजी नगर या ठिकाणाहून मालेगावला पोहचता येतं. मालेगावातल्या मोसम नदीचा काठावर किल्ला आहे. हा किल्ला नारोशंकर यांनी बांधला आहे. १७४० मध्ये हा किल्ला बांधण्यात आला. नारोशंकर हे पेशव्यांचे सरदार होते. नारोशंकर यांचा पेशव्यांबरोबर बेबनाव झाला होता. मात्र तो नंतर मिटला, त्यानंतर नारोशंकर यांनी मालेगाव येथे वाडा बांधण्याची परवानगी पेशव्यांकडून मिळवली. मोसम नदीच्या काठावरची जागा उत्तम असल्याची माहिती सल्लागारांनी नारोशंकर यांना दिली होती. मात्र नारोशंकर यांनी वाडा न बांधता किल्लाच बांधून काढला, तेव्हापासून हा किल्ला मालेगावकडे पाहात उभा आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Malegaon central how the consistency became muslim consistency know about it scj

First published on: 18-09-2024 at 21:17 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
Show comments