scorecardresearch

Malegaon Results: मालेगावात भाजपचे मुस्लिम कार्ड फेल; काँग्रेसला सर्वाधिक जागा

मालेगाव महानगरपालिकेच्या लाईव्ह रिझल्टसाठी क्लिक करा.

Malegaon municipal corporation election results 2017, BJP, Congress , Shiv Sena , Live Election results
Malegaon mahanagar palika results : सध्या देशभरात गाजत असलेल्या गोमांसबंदी आणि तिहेरी तलाकसारख्या मुद्द्यांचे पडसाद मालेगावात पाहायला मिळणार का, हे पाहणेदेखील औत्स्युकाचे ठरेल.

राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या मालेगाव महानगरपालिका निवडणुकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. सध्या देशभरात पीछेहाट होत असलेल्या काँग्रेससाठी हा निकाल आश्वासक ठरला आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या यशाचे गमक समजलेल्या भाजपची रणनीती याठिकाणी सपशेल फोल ठरताना दिसली. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये मालेगाव महानगरपालिकेत २८ जागा मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दलाच्या युतीने संयुक्तपणे २६ जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीपैकी कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे पालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे १३ जागांवर विजय मिळवणाऱ्या शिवसेनेची सत्तास्थापनेतील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तर भाजपला अवघ्या ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. याशिवाय, आतापर्यंत महापालिकेत कोणतेही अस्तित्त्व नसलेल्या एमआयएम पक्षाला या निवडणुकीत मिळालेले यशही लक्षवेधक आहे. एमआयएमने एकूण ७ जागांवर विजय मिळवला आहे.

सध्या देशभरात गाजत असलेल्या गोमांसबंदी आणि तिहेरी तलाकसारख्या मुद्द्यांचे पडसाद मालेगावात पाहायला मिळणार का, याची अनेकांना उत्सुकता होती. अलीकडेच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिली नव्हती. मात्र, मालेगाव महानगरपालिकेत भाजपने तब्बल २७ मुस्लिमांना उमेदवारी देण्याची चाल खेळली होती. त्यामुळे मुस्लिमबहूल असलेल्या मालेगाव पूर्वमध्ये यश मिळेल, अशी पक्षाला अपेक्षा होती. परंतु, भाजपचा हा अंदाज सपशेल चुकला. मात्र, मालेगाव महानगरपालिकेतील भाजपची आतापर्यंतची कामगिरी लक्षात घेता हा निकालदेखील पक्षाच्यादृष्टीने यशदायी म्हणावा लागेल. तर दुसरीकडे हिंदूबहुल मतदार असणाऱ्या पश्चिम मालेगावमध्ये शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्व प्रस्थापित उमेदवारांना नाकारून नवीन चेहऱ्यांनी संधी दिली होती. या नाराज नगरसेवकांमुळे शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्व जोर लावला होता. त्यांची ही रणनीती यशस्वी ठरल्याने मागील निवडणुकीपेक्षा शिवसेनेच्या जागांमध्ये वाढ झाली आहे.

Panvel, Bhiwandi Results Live : पनवेल महापालिकेवर कोणाचा झेंडा ?

 

ठळक घडामोडी

* काँग्रेस २८, राष्ट्रवादी २०, शिवसेना १३, एमआयएम ७, जनता दल ६, भाजपचा ९ जागांवर विजय
* भाजप ३, काँग्रेस २८, राष्ट्रवादी २६, शिवसेना ११, एमआयएम ७ आणि अपक्षाचा एका जागेवर विजय
* मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपच्या पदरात निराशा
* काँग्रेस ३०, राष्ट्रवादी २४, शिवसेना १० , एमआयएम ११, भाजप ३ आणि दोन जागांवर आघाडी
* शिवसेना ७, काँग्रेस १५, राष्ट्रवादी ५, भाजप २, एमआयएम ६ जागांवर विजयी
* उपमहापौर युनूस इसा एमआयएम विजयी
* काँग्रेसचे माजी आमदार शेख रशिद,त्यांची पत्नी माजी महापौर ताहेरा शेख विजयी
* शिवसेना-७, काँग्रेस ११, राष्ट्रवादी काँग्रेस-५, एमआयएम-२ आणि भाजप एका जागेवर विजयी
* मालेगाव मनपाच्या प्रभाग १८ अ- अब्दुल माजिद युनूस (एमआयएम), ब- शेख कुलसूम शेख रफिक (एमआयएम), क- हमिदा साहेब अली (काँग्रेस), ड- इसराईल खान ईस्माइल खान (काँग्रेस) विजयी
* भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी महापौर नरेंद्र सोनवणे यांचा पराभव
* मालेगावात शिवसेना ३, काँग्रेस ४, भाजप आणि एमआयएमचा प्रत्येकी एका जागेवर विजय
* शिवसेनेची नवीन चेहरे देण्याची रणनीती यशस्वी
* पश्चिम मालेगावमध्ये भाजपपेक्षा शिवसेना वरचढ; ९ जागांवर शिवसेनेची आघाडी, भाजपला दोन जागांवर आघाडी
* पूर्व मालेगावमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार चुरस; एमआयएमची ६ जागांवर आघाडी
* शिवसेना ७, काँग्रेस ५, राष्ट्रवादी ५, भाजप आणि एमआयएमचा प्रत्येकी एका जागेवर विजय
* शिवसेनेचे महानगरप्रमुख रामा मिस्तरी यांच्या पत्नी सुनिता पराभूत
* जनता दलाचे युवा नेते बुलंद एकबाल आघाडीवर
* पूर्व मालेगावमध्ये काँग्रेसची आघाडी; पश्चिम मालेगावमध्ये शिवसेनेची मुसंडी
* मालेगावमध्ये सुरुवातीच्या सत्रात काँग्रेस आणि एमआयएमने खाते उघडले; राष्ट्रवादी काँग्रेसचीही एका जागेवर आघाडी
* काँग्रेसच्या ७३, राष्ट्रवादी ५२, जनता दल १० , भाजप ५६,  शिवसेना २६, एमआयएम-३५ आणि १०१ अपक्ष उमेदवारांचे भवितव्य थोड्याचवेळात कळणार
* सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी
* कॅम्परोडच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या नवीन इमारतीत १, २, ८, ९, १०, ११ या प्रभागांची मतमोजणी होणार असून, शिवाजी जिमखान्यात १२, १५, १७, १८, २० व २१ या प्रभागांची तर तालुका क्रीडा संकुलात ५, ६, ७, जाखोट्या भवनात १४, १६, १९ तर श्रीकृष्ण लॉन्समध्ये ३, ४, १३ या प्रभागांची मतमोजणीला सुरूवात
* मतमोजणीला सुरुवात
* मालेगाव महानगरपालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल: शिवसेना-११, काँग्रेस २५, शहर विकास आघाडी-८, तिसरा महाज-१९, समाजवादी पक्ष-१, जनता दल-४, मनसे-२, जनराज्य आघाडी-१, अपक्ष ५
* मोसम नदीच्या पूर्व भागात मुस्लीमबहुल आणि पश्चिम भागात हिंदूबहुल वस्ती; पूर्व भागातील निकालांवर सर्वांचे लक्ष
* थोड्याचवेळात होणार मतमोजणीला सुरुवात

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-05-2017 at 09:27 IST