अपघातात दुचाकीवरील तीन बहिणींसह युवकाचा मृत्यू

अपघातात मृत झालेले सर्व जण नातेवाईक होते. पायल आणि विशाखा सख्या बहिणी असून साक्षी चुलत बहीण  होती.

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव शिवारात नाशिक-मुंबई महामार्गावर  सोमवारी सायंकाळी  टेम्पोची धडक बसल्याने दुचाकीवरील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन बहिणींचा समावेश आहे.

मुंढेगाव शिवारातील चौफुलीवरून तुषार कडू (२५)  हे  दुचाकीने पायल ज्ञानेश्वर गतिर ( ११ ), विशाखा ज्ञानेश्वर गतिर ( सात, सर्व रा. मुंढेगाव, इगतपुरी) आणि साक्षी उर्फ ईश्वरी हिरामण डावखर (१०, गिरणारे) यांना घेऊन निघाले होते.  महामार्गावर भरधाव आलेल्या आयशर टेम्पोची दुचाकीला धडक बसली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि ग्रामस्थांनी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातानंतर मोठय़ा प्रमाणात मुंढेगावातील नागरिक रस्त्यावर उतरले होते. अपघातात मृत झालेले सर्व जण नातेवाईक होते. पायल आणि विशाखा सख्या बहिणी असून साक्षी चुलत बहीण  होती. तुषार कडू हे चुलते असल्याचे सांगण्यात आले. या अपघात प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Man along with three sisters killed in bike accident zws

ताज्या बातम्या