मनमाड-सीएसएमटी विशेष रेल्वेगाडीला मुदतवाढ

या गाडीसाठी गुरुवारपासून नोंदणी सुरू होणार असून करोनासंबंधी सर्व नियम त्यासाठी लागू होणार आहेत.

Manmad-CSMT special train,
(संग्रहित छायाचित्र)

मनमाड : गोदावरी एक्स्प्रेसच्या वेळेत प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली मनमाड -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  (०२१०२ डाऊन) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  – मनमाड  (०२१०१ अप) या गाडीस पुढील तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने रात्री उशिरा याबाबत माहिती दिली.

ही गाडी ३० जूनपर्यंतच प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. पण तिला प्रवाशांनी प्रतिसाद दिल्याने आता या गाडीस १ जुलै ते ३० सप्टेंबपर्यंत (९२ फेऱ्या) साठी मंजुरी दिली आहे. मनमाड – नाशिक- मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांची जीवनदायिनी ठरलेली गोदावरी एक्स्प्रेस करोना काळात बंद झाल्यानंतर या भागातील प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन रेल्वेने ही नवीन विशेष गाडी गोदावरी एक्स्प्रेसच्या वेळेत सुरू केली होती. तिला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास त्यास मुदतवाढ दिली जाईल असे जाहीर केले होते. या गाडीसाठी गुरुवारपासून नोंदणी सुरू होणार असून करोनासंबंधी सर्व नियम त्यासाठी लागू होणार आहेत. यामुळे मनमाड, नाशिक, मुंबई दरम्यान दररोज ये-जा करणारे प्रवासी, व्यापारी, उद्योजक, चाकरमानी, विद्यार्थी यांची मोठी सोय होणार आहे.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manmad cstm special train extended for next three month zws

Next Story
परवानगीसाठी नगररचना विभागात गर्दी ; प्रत्यक्ष उपस्थितीची मुदत संपत आली; १ जुलैपासून आभासी प्रणाली
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी