मालेगाव: रस्त्यावरील खड्डे व गटारातील सांडपाण्यामुळे त्रस्त झाल्याने आंदोलन करणाऱ्या ‘एमआयएम’च्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांवर चक्क गटारातील पाणी व गरम चहा फेकण्याचा प्रकार गुरुवारी येथे घडला. पालिका प्रशासनाने आंदोलनाची दखल घेण्यास विलंब केल्यामुळे आंदोलकांनी हा पवित्रा घेतल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा >>> नाशिक: शहरात चोरट्यांची दिवाळी; चार घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
pune, fergusson college, holi, boy, throwing water, balloons, pedestrians, arrested, police,
होळीच्या दिवशी रस्त्यावर फुगे मारणारी हुल्लडबाज मुले ताब्यात; पोलिसांकडून पालकांवर गुन्हे

शहरातील जुना आग्रारोडवरील देवीचा मळा परिसरात रस्त्याच्या दुतर्फा सुरु असलेल्या गटार कामामुळे संपूर्ण रस्त्यावर सांडपाणी साचत आहे. तसेच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले त्यामुळे वाहनधारक व नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. गुरुवारी दुपारी एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल यांनी देवीचा मळा भागात आपल्या कार्यकर्त्यांसह अचानक रस्त्यावर ठिय्या मांडला. महापालिका आयुक्तांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन यासंदर्भात आश्वासन द्यावे असा आंदोलकांचा आग्रह होता. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी सुरू केली. या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली.

हेही वाचा >>> नाशिक: विजेच्या धक्क्याने महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

दरम्यान, आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आयुक्त भालचंद्र गोसावी हे आंदोलन स्थळी दाखल झाले. ते येताच काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर गरम चहा आणि गटारातील पाणी फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला.यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यावेळी पोलीस व महापालिकेतील अन्य अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. आंदोलनामुळे बराचवेळ जुना राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. त्यामुळे येथील नवीन बसस्थानकातून सुटणाऱ्या आणि धुळे,चाळीसगावकडून या स्थानकात येणाऱ्या बसगाड्यांचा मार्ग बदलण्यात आला होता.

या रस्त्याच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून लवकरच हे काम पूर्णत्वास जाणार आहे. आंदोलकांना हीच वस्तुस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न आपण करीत होतो. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यातूनच कुणीतरी आपल्या अंगावर गरम चहा व गटारातील पाणी फेकले.

– भालचंद्र गोसावी, आयुक्त तथा प्रशासक, मालेगाव महानगरपालिका.