नाशिक : मंत्री झाल्यानंतरही कोणताही तोरा न मिरवता आपल्या मतदार संघातील विद्यार्थ्यांची सहल मुंबईत आल्याची माहिती मिळाल्यानंतर सकाळी सहापासून ते ११ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांबरोबर बसमध्ये प्रवास करत त्यांना मंत्री नरहरी झिरवळ यांनी मुंबईचे दर्शन घडवले. दिवसभर मुलांनी मुंबईतील विविध प्रेक्षणीय स्थळे बघितल्यावर रात्री झिरवळ यांनी त्यांना एका तारांकित हॉटेलमध्ये भोजनही दिले. प्रत्येकाशी बोली भाषेत हितगुज केले. झिरवळ यांच्या आदरातिथ्याने विद्यार्थी भारावून गेले.

हेही वाचा : प्रस्तावित वाढवण बंदराबरोबर नाशिक जोडणार

nashik land purchase fraud
नाशिक : हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या नावाने फसवणूक, दोन जणांविरुद्ध गुन्हा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Supriya sule and pankaja Munde
Supriya Sule : “बीडची बदनामी केली जातेय”, पंकजा मुंडेंच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार; म्हणाल्या, “कोणताही जिल्हा…”
arrest one after police thrilling chase of ganja smugglers car
गांजा तस्करांच्या मोटारीचा पोलिसांकडून थरारक पाठलाग; संशयितास पोलीस कोठडी
homosexual, Akola , Marriage for money,
अकोला : पैशांसाठी लग्न, पोलीस पत्नीचा छळ अन् पती निघाला समलैंगिक….
five year old boy electrocuted loksatta news
नाशिक : उघड्या रोहित्रामुळे अल्पवयीन मुलाचा मृत्यू
manmohan singh marathi news
डॉ. सिंग यांच्या स्मारकासाठी दोन जागांचा पर्याय
upsc loksatta
UPSCची तयारी : नैतिक द्विधांचे स्वरूप (भाग २)

दिंडोरी येथील कर्मवीर रा. स. वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्था संचलित भनवड आश्रमशाळेची शैक्षणिक सहल मुंबई येथे गेली. बुधवारी सकाळी सहा वाजता सहल गेट वे ऑफ इंडिया येथे आल्याचे समजताच मंत्री झिरवळ हेही सहलीत सहभागी झाले. गेट वे ऑफ इंडिया पासून ते राजभवनपर्यंतचा प्रवास मुलांच्या बसमधून करतानाच मुंबईमधील प्रसिद्ध ठिकाणांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. आपल्या व्यस्त कार्यक्रमांमधून झिरवळ यांनी वेळ काढल्याने विद्यार्थी सुखावले. नेहरू तारांगण, विधान भवनला विद्यार्थ्यांनी भेट दिली. झिरवळ यांनी विद्यार्थ्यांना विधानसभा दाखवत सभागृहाचे कामकाज कसे चालते, याविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली. विधानसभा, विधान परिषद यातील फरक सांगतानाच त्यांच्या कार्याची, सभागृहातील बैठकीविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली. या सहलीसाठी मंत्री झिरवळ, संस्थेचे मार्गदर्शक तथा कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, संस्थेचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी, संस्था सचिव बाळासाहेब उगले, स्विय सहायक अमर परुळेकर यांचे सहकार्य लाभले.

Story img Loader