नाशिक – साहेब, टीव्हीवरील गुन्हेविषयक मालिका किंवा काही पाहुन गुन्हे घडतात हे खोटं असतं. खरा फक्त गुन्हा असतो…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे विधान काही एखाद्या नाटक वा चित्रपटातील नव्हे तर, १६ वर्षाच्या विधीसंघर्षित बालकाचे आहे. त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील चार वर्षाच्या बालक मृत्यू प्रकरणी पोलिसांनी आश्रमातीलच विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली देताना ऐकविलेल्या विधानाने पोलीसही चक्रावले आहेत. संशयितास निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमात राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुले व मुली राहतात.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांच्या कथित भविष्य पाहणीवरून वाद; बेजबाबदारपणाची कृती: अंधश्रद्धा निर्मूलन समितीची टीका

२२ नोव्हेंबर रोजी चार वर्षाच्या आलोक शिंगारेचा मृतदेह संस्थेच्या आवारात आढळला. आलोकचा धक्कादायक मृत्यू आश्रमाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. हा प्रकार होण्याआधी आश्रमातच राहणाऱ्या आलोकच्या मोठ्या भावाचे १६ वर्षाच्या संशयिताशी भांडण झाले होते. आलोकच्या मृत्यूला या भांडणाची किनार असेल, असा संशय व्यक करण्यात आला. पोलिसांनी कर्मचाऱ्यांसह संस्थाचालकांची कसून चौकशी केली. यामध्ये १६ वर्षाच्या बालकानेच खून केल्याचे उघड झाले. पोलिसांनी संशयित बालकाची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यावेळी कुठे पाहून असे केले, असा प्रश्न पोलिसांनी त्यास विचारला असता, टीव्ही किंवा अन्य ठिकाणी मालिका पाहुन गुन्हे घडत नाही. गुन्हे घडून जातात, असे त्याने सांगितले. तुम्हांला माहिती आहे का सीआयडी मालिकेतील दया आरोपीपर्यंत कसा पोहचतो, डॉक्टर किंवा त्यांचा प्रमुख गुन्ह्याचा उलगडा कसा करतात, असे किस्से संशयिताने पोलिसांना ऐकविले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor boy in police custody in child murder in aadhartirtha ashram zws
First published on: 25-11-2022 at 20:38 IST