mns chief raj thackeray worship at saptshrungi devi ssa 97 | Loksatta

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सपत्नीक सप्तश्रृंगी देवीच्या चरणी

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, त्यांनी सपत्नीक सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेतलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सपत्नीक सप्तश्रृंगी देवीच्या चरणी
राज ठाकरे ( संग्रहित फोटो )

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. हा राजकीय दौरा नसल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. मात्र, आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.

राज ठाकरे यांनी नाशिकला येण्यापूर्वी शनिवारी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आज ( २ ऑक्टोंबर ) राज ठाकरेंनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह वणी येथील आदिशक्ती सप्तश्रृंगीदेवीचे दर्शन घेतलं आहे. यावेळी त्यांच्यासमवेत मनसेचे पदाधिकारीही उपस्थित होते.

दरम्यान, १५ दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी विदर्भ दौरा केला आहे. यावेळी त्यांनी नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. तसेच, आगामी महापालिका निवडणुकांसाठी कामाला लागण्याचा संदेशही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-10-2022 at 11:59 IST
Next Story
नाशिक : राज ठाकरे यांचे धार्मिक तीर्थाटन