नाशिक : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत पंचवटी आणि उपनगर परिसरात दहशत माजविणाऱ्या विशाल भालेराव याच्या टोळीतील चार जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीतील सदस्यांविरोधात पंचवटी व उपनगर पोलीस ठाण्यात ११ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. मार्चमध्ये या टोळक्याने पंचवटीत गावठी बंदूक आणि कोयत्याने एकावर प्राणघातक हल्ला केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही वर्षांपूर्वी वेगवेगळ्या भागात गुन्हेगारी टोळ्यांचे प्राबल्य होते. उभयतांमधील वादाची झळ अनेकदा स्थानिकांना सहन करावी लागल्याचा इतिहास आहे. तेव्हा काही टोळ्यांना राजाश्रय लाभला होता. राजकीय नेत्यांकडून गुन्हेगारांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पाठबळ दिले जात होते. गुन्हेगारी टोळ्या आणि राजकीय नेते यांच्या संबंधांची चौकशी पोलिसांनी करीत अनेक टोळ्यांवर कठोर कारवाई केली होती. त्यामुळे निर्माण झालेल्या शांततेला काही टोळ्या आजही अधुनमधून आव्हान देतात. मार्च २०२३ मध्ये पंचवटीतील फुलेनगर भागात विशाल भालेरावच्या (मुंजाबाबा गल्ली, फुलेनगर) टोळीतील साथीदारांनी कोयते आणि गावठी बंदूक घेऊन प्रेम महाले यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या गुन्ह्याच्या तपासात भालेरावने विकास उर्फ विक्की वाघ (२५), जय खरात (१९, फुलेनगर) आणि संदीप आहिरे (२०, तिघेही फुलेनगर) यांना घेऊन टोळी तयार केल्या.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mokka city police take strict action against the criminals who fired at panchvati ysh
First published on: 29-05-2023 at 14:54 IST