जळगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त सुवर्णनगरी जळगावात सोने खरेदीस प्रतिसाद दिसून आला. सुवर्ण खरेदीतून २० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. गुढीपाडव्याला सोने खरेदीकडे अनेकांचा कल असतो. मागील काही दिवसांत सोन्याच्या प्रतितोळा दरात मोठी वाढ झाली आहे. बुधवारी सोने दर प्रतितोळा ५८ हजार ७०० रुपये, तर चांदीचा दर प्रतिकिलो ६९ हजार रुपये होता. दोन फेब्रुवारी रोजी सोन्याचा दर प्रतितोळा ५८ हजार ८८० रुपये होता. त्यात महिनाभरापासून चढ-उतार सुरूच होते. गुढीपाडव्याच्या दोन दिवसांपूर्वी सोने प्रतितोळा ६० हजारांपुढे गेले होते. सोमवारी दर ५९ हजार ७५० रुपये होते.

तीन दिवसांत सोन्याच्या दरात प्रतितोळा सुमारे एक हजार ५० रुपयांनी घसरण झाली. सोने खरेदी करताना सर्वच प्रकारच्या दागिन्यांना मागणी दिसून आली. मुहूर्तावर खरेदी करायची असल्याने अनेक जुने दागिने मोड देऊन मंगळसूत्र, अंगठी व इतर कलाकुसरीचे दागिने करण्यास पसंती देण्यात आली. कलाकुसरीच्या बारीक सोनपोत, कर्णफुले, गव्हाळ मणी, डिझाइनर पँडल; यासोबत पुरुषांच्या सोनसाखळीला मागणी असल्याने आगामी काळात खरेदी वाढू शकते. चांदीची चमकही कायम राहिली. बुधवारी चांदीचा दर प्रतिकिलो ६९ हजार रुपये होता. मंगळवारी सायंकाळी चांदीचा दर प्रतिकिलो ६९ हजार ५०० रुपये होता. त्यात बुधवारी ५०० रुपयांची घसरण झाली.

125 people poisoned because of Mahaprasad One is dead six people are serious
चंद्रपूर : महाप्रसादातून १२५ जणांना विषबाधा; एकाचा मृत्यू, सहा जण गंभीर
gudi padwa in Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला सुमारे १५० बालकांचा जन्म, मुलींचा टक्का अधिक
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या

आगामी काळातही दिवसागणिक दर वाढून सोन्याचा प्रतितोळा दर ६२ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. सोने खरेदीदारांची संख्या ५० टक्के आणि गुंतवणूकदारांची संख्या ५० टक्के आहे.

– अजय ललवाणी (अध्यक्ष, जिल्हा सराफ असोसिएशन, जळगाव)