नाशिक – सिडकोतील पवन नगर येथे दोन दुचाकीने आलेल्या सात गुंडांनी कोयते आणि लाकडी दंडुक्यांनी १५ ते २० दुचाकी, चार ते पाच रिक्षा तसेच काही चारचाकींची तोडफोड केल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. या प्रकरणी चार विधीसंघर्षित मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शहर परिसरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस पोलिसांपुढे आव्हान निर्माण करीत आहे. गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढच होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. पवन नगर येथे रात्री गुंडांनी दहशत माजवली. सप्तशृंगी चौक, स्वामीनारायण चौक या भागात रात्री साडेदहा ते ११ या वेळेत दोन दुचाकींवरून सात गुंड आले. त्यांच्या हातात कोयते, लाकडी दंडुके होते. त्यांनी रस्त्यातील दुचाकींच्या काचा फोडल्या, काही दुचाकी रस्त्यावर पाडल्या. काही रिक्षांच्या, चारचाकींच्या काचा फोडल्या. शिवीगाळ करीत नागरिकांना धमकावित निघून गेले.

Arvind Kejriwal Mango eating Controversy How Much Calories and Sugar Does One Mango has
केजरीवालांनी आंबा खाल्ल्याने वाद; डायबिटीक रुग्णांनी आंबा खाल्ल्याने काय होईल? १ वाटी आंब्यात काय दडलंय, बघा
Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप

हेही वाचा – नाशिक : पिंपळगाव बाजार समिती सभापतिपदी आमदार दिलीप बनकर

या प्रकाराविषयी काही नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळविले. परंतु, पोलीस उशिरा आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. अंबड पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल थेट आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. हा प्रकार ज्या ठिकाणी घडला, त्या ठिकाणी पोलीस चौकी आहे. मात्र ही चौकी अनेक वेळा बंदच असते. दरम्यान, चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती अंबड पोलिसांनी दिली आहे.