नाशिक : अस्ताव्यस्त वाढलेली झाडे, साफसफाई होत नसल्याने पडून राहणारा पालापाचोळा, दिव्यांची तोडफोड, नियमित पाणी न दिल्याने सुकलेली शोभेची झाडे व हिरवळ आणि यामुळे प्राप्त झालेले बकाल स्वरुप… शहरातील अनेक उद्याने व जॉगिंग ट्रॅ्कच्या दुरावस्थेवर बोट ठेवत मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी उद्यान विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले.

विविध भागांतील उद्याने व जॉगिंग ट्रॅकच्या दुरावस्थेविषयी नागरिक व संघटनांकडून तक्रारी होत आहेत. प्रमुख उद्यानांच्या देखभालीची जबाबदारी खासगी ठेकेदारांकडे आहे. मात्र त्यांच्याकडून अटी-शर्तीनुसार कामे होत नाहीत. त्यावर संबंधित विभागाचे उद्यान निरीक्षक व विभागप्रमुख म्हणून उद्यान अधीक्षक यांचे नियंत्रण नसल्याचे दिसून येते, असे आयुक्त खत्री यांनी सूचित केले. उद्यान विभागाच्या कामात तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.

Farmers warned they wont hand over land for Borvihir Nardana railway without proper compensation
योग्य मोबदला न मिळाल्यास रेल्वेमार्गासाठी जमीन न देण्याचा इशारा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
nashik Dialysis center service
नाशिक महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयात आता डायलिसीस केंद्र
Five children who escaped from observation home detained
निरीक्षण गृहातून पळालेली पाच बालके ताब्यात
Information from the Union Health Ministry regarding HMPV
‘एचएमपीव्ही’चे आधीपासूनच अस्तित्व! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती; परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची ग्वाही
4 year old air hostess in Kalyan West cheated in online fraud
कल्याणमधील हवाई सुंदरीची ऑनलाईन, व्यवहारात नऊ लाखाची फसवणूक
pune rajgurunagar two girls raped news
पुणे : ‘राजगुरुनगर’ अत्याचार प्रकरणात कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची नुकसान भरपाई
Police commissioner ordered deportation of 74 manja sellers
शहरातून ७४ नायलाॅन मांजा विक्रेते हद्दपार, पोलीस आयुक्तांची कारवाई

हेही वाचा…नाशिक : निकृष्ट भोजन निषेधार्थ आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन

उद्यान व जॉगिंग ट्रॅकवरील झाडांना वेळेवर पुरेसे पाणी दिले जात नाही. शोभेची झाडे व हिरवळीची छाटणीही होत नाही. साफसफाईअभावी पालापाचोळा पडून राहतो. अनेक ठिकाणी पायी चालण्याच्या मार्गावर फरशा निघाल्या आहेत. उद्यानातील खेळण्यांची तोडफोड होऊनही त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. उद्यान व जॉगिंग ट्रॅकवरील काही दिव्यांची तोडफोड झाली तर, काही दिवे कित्येक दिवसांपासून बंद आहेत.

हेही वाचा…नाशिकरोड कारागृहातील जमिनीत दोन भ्रमणध्वनी, गुन्हा दाखल

अनेक मोठमोठ्या उद्यानांमध्ये सुरक्षारक्षकाची नेमणूक केलेली नसल्याने त्याठिकाणी नासधूस होत असून अनेक वेळेस चोऱ्या देखील होत असतात. उद्यान व ट्रॅकवरील झाडांच्या संरक्षण जाळ्या तुटलेल्या किंवा काही ठिकाणी चोरीस गेलेल्या आहेत. संरक्षक भिंतींची अवस्था फारशी वेगळी नाही. सुरक्षारक्षक नियुक्त नसल्याने उद्यानात नासधूस व चोऱ्या होतात. या तक्रारींची दखल घेत आयुक्त खत्री यांनी उद्यान विभागाच्या कामात सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.

उद्यान निरीक्षकांचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांकाचे फलक

उद्याने व जॉगिंग ट्रॅकच्या प्रवेशद्वारावर दर्शनी भागात आठ दिवसांत संबंधित विभागाचे निरीक्षक व उद्यान अधीक्षकांच्या नावासह भ्रमणध्वनी क्रमांकाचे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जेणेकरून नागरिकांना संपर्क साधता येईल. उद्यान अधीक्षकांनी उद्यान निरीक्षकांना त्यांच्या अधिपत्याखालील उद्याने व जॉगिंग ट्रॅकच्या सुधारण्यासाठी कामाच्या वेळा निश्चित करून द्याव्यात. स्वतः सर्व विभागात नियमित भेटी देऊन तेथील व्यवस्था व सुधारणेची पाहणी करावी, असे बजावण्यात आले आहे. याचा साप्ताहिक अहवाल सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे.

Story img Loader