नियमांची पूर्तता करण्याचे आव्हान

नाशिक : करोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याने शहर परिसरातील महापालिका शाळा १३ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना एवढय़ा कमी वेळेत आरोग्य विभागासह राज्य शासनाच्या नियमांची पूर्तता करण्याचे शाळांसमोर आव्हान आहे.

onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार

करोना संसर्गाचा धोका बालकांपर्यंत पोहोचू नये, यासाठी शाळा नव्या शैक्षणिक वर्षांत बंदच ठेवण्यात आल्या होत्या. दिवाळीनंतर शाळा सुरू होतील, अशी चर्चा असतांना करोनाच्या नवीन विषाणूने डोके वर काढले. ग्रामीण भागात पाचवी ते १२ वीचे वर्ग सुरू झाले असले तरी महापालिका आयुक्त, प्रशासनाधिकारी यांच्या पवित्र्यामुळे शहरात शाळा सुरू होऊ शकल्या नाही. परिस्थती नियंत्रणात असल्याने गुरूवारी महापालिका प्रशासनाधिकारी सुनिता धनगर यांनी शहर परिसरातील सर्व माध्यमांच्या पहिली ते सातवीच्या शाळा १३ डिसेंबरपासून सुरु करण्याचा आदेश दिला.

या आदेशामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र प्रशासनाने शाळा सुरू करतांना आणि शाळा सुरू झाल्यावर काय काळजी घ्यावी याची नियमावली दिली आहे. या नियमांची पूर्तता करण्यासाठी अवघ्या ७८ तासांचा कालावधी असल्याने ही एकप्रकारे शाळांची परीक्षाच आहे.

महापालिकेसह शहर परिसरातील वेगवेगळय़ा माध्यमांच्या एक हजार आठ शाळांमधून तीन लाख ७० हजार, ५५८ विद्यार्थी शाळेत येणार आहेत. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांची पूर्तता करण्याची सुचना देण्यात आली असल्याचे प्रशासनाधिकारी धनगर यांनी सांगितले.

सुरक्षेच्या उपाययोजना

  •    शाळेत विलगीकरण केंद्र असल्यास त्याचे र्निजतुकीकरण केले जावे
  •    वाहनांचे र्निजतुकीकरण करण्यात यावे
  •    शिक्षकांची करोना चाचणी करण्यात यावी 
  •    सामाजिक अंतर, मुखपट्टीचा वापर, अंतर राखण्यासाठी

विशिष्ट खुणांचा वापर केला जावा

  •    परिपाठ, स्नेहसंमेलन कार्यक्रमांवर र्निबध
  •    पालकांचे संमती पत्र आवश्यक
  •    शहर परिसरातील सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात
  •    विद्यार्थ्यांची दररोज तापमान तपासणी
  •    पहिली ते चौथीचे कुठलेही खेळ घेऊ नयेत

या विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी

जास्त चिडचिड करणारे, रागीट आणि लहान गोष्टीवरुन निराश होणारे, वयाशी विसंगत कृती करणारे, वर्गात शांत बसणारे, असहाय्य झालेले, सतत रडणारे, अशा विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी. प्रत्येक विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अभ्यासावर भर न देता इतर विषय मांडावेत, पालकांशी पाठपुरावा करावा.