scorecardresearch

Premium

नंदुरबारमध्ये विसर्जन मिरवणुकीत दादा-बाबा हरिहर भेट सोहळा उत्साहात

हा  सोहळा पाहण्यासाठी  जिल्ह्यातून तसेचर गुजरात आणि मध्यप्रदेशातूनही गणेशभक्तांनी गर्दी केली होती.

nandurbar ganpati utsav shri dada baba ganpati hari har bhet ceremony
दादा-बाबा हरिहर भेट सोहळा उत्साहात

नंदुरबार– शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत दादा आणि बाबा गणपती  यांचा हरिहर भेट सोहळा मोठ्या दिमाखात झाला. यावेळी  मोठ्या प्रमाणआवर आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली. दादा आणि बाबा या दोन गणपतींच्या हरिहर भेटीच्या उत्सवाला शत्तकोतर वर्षांची परंपरा आहे. दोन्ही मानाच्या गणरायांच्या मिरवणुकीला रथावरुन सुरवात होते.

हेही वाचा >>> जळगाव जिल्ह्यात विसर्जनावेळी तरुण बुडाला, शोध चालू

panchganga river, pollution, Valivade village, kolhapur city, chemical discharge, dead fish
कोल्हापुरात पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषित, वळीवडेत मृत मासे नेण्यासाठी गर्दी; नदी प्रदूषणावरून संताप
Ganesh Jayanti in Kolhapur District
कोल्हापूर जिल्ह्यात गणेश जयंती उत्साहात
gadchiroli elephant marathi news, aheri taluka elephant marathi news, kamlapur villagers marathi news
गडचिरोली : ‘मंगला’ला नेण्यासाठी आलेल्यांना परत पाठवले, हत्ती स्थलांतराला गावकऱ्यांचा विरोध
maharashtra government sanctioned disbursement of rs 11 thousand 726 crore for krishna marathwada irrigation project mla ranajagjitsinha patil
पाच महिन्यात कृष्णेचे पाणी मराठवाड्यात, दोन तपाची प्रतीक्षा संपणार: आमदार पाटील

यानंतर मानाचा प्रथम गणपती असलेल्या दादा गणपतीची गावभर रथयात्रा फिरून रात्री अकराच्या  सुमारास जळका बाजार परिसरात आला. दुसरा मानाचा गणपती असलेल्या बाबा गणपतीचा रथ देखील या ठिकाणी काही वेळातच  आला. दोन्ही रथ समोरासमोर आल्यानंतर परंपरेप्रमाणे दोन्ही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एक दुसऱ्या गणरायाची आरती केली. आकर्षक आतिशबाजी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदु राहिली. हा  सोहळा पाहण्यासाठी  जिल्ह्यातून तसेचर गुजरात आणि मध्यप्रदेशातूनही गणेशभक्तांनी गर्दी केली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nandurbar ganpati utsav shri dada baba ganpati hari har bhet ceremony zws

First published on: 29-09-2023 at 17:08 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×