नाशिक : भावकीच्या वडिलोपार्जित विहिरीच्या वादातून सख्या भावाच्या कुटूंबियांनी ८० वर्षाच्या व्यक्तीवर इंधन टाकून पेटवून दिले. निफाड तालुक्यातील सारोळे (थडी) येथे ही घटना घडली. वृध्द ९५ टक्के भाजल्याने जिल्हा रुग्णालयात त्यांचा रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कचेश्वर नागरे असे वृध्दाचे नाव आहे. सारोळे येथील नागरे बंधूंमध्ये वडिलोपार्जित विहिरीवरून वाद आहेत. वयोवृध्द कचेश्वर हे मंगळवारी शेतातील घराजवळ साफसफाई करीत असताना ही घटना घडली. कचेश्वर यांचे कुटूंबिय घरात असल्याची संधी साधत हातात डिझेलचे डबे घेवून आलेल्या त्यांच्या धाकट्या भावासह भावजई आणि दोन पुतण्यांनी कचेश्वर यांच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले. कचेश्वर यांनी सैरभैर पळत आग विझविण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा…जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याची हत्या

ओरडण्याचा आवाज आल्याने कुटूंबियांनी घराबाहेर धाव घेतली तत्पूर्वीच संशयित य पसार झाले होते. या घटनेत कचेश्वर गंभीर भाजल्याने मुलगा हनुमंत नागरे यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच निफाड पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. जखमी नागरे यांचा रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.