नाशिक – निमवैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सोमवारी थेट रुग्णवाहिका घेऊन विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच कुलगुरु यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात अभाविपने निमवैद्यकीयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आंदोलन केले. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्ताला न जुमानता प्रवेश करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. शैक्षणिक अर्हतेनुसार पदभरती, निमवैद्यकीय विद्यार्थ्यांशी होणारा दुजाभाव, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नसणे, नियमित अध्यापन न चालणे, असे विविध विषय मांडण्यात आले. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून १४ विविध प्रकारचे निमवैद्यकीय चार वर्षांचे पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. रुग्णसेवेसाठी राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना मदतनीस म्हणून प्रशिक्षित कर्मचारी मिळावेत, अशी या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. महाराष्ट्रातील कुठल्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या विद्यार्थ्यांना नियमित अध्यापन करण्यात येत नाही. इतर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या तुलनेत निमवैद्यकीय विद्यार्थ्यांशी सतत दुजाभाव करण्यात येतो. कुठल्याही महाविद्यालयात या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध नसून स्वतंत्र वर्ग आणि वसतिगृहही महाविद्यालयांमध्ये नाही. हा अभ्यासक्रम व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या यादीत समाविष्ट नसल्याने शिष्यवृत्ती किंवा मुलींना मोफत शिक्षणाची योजना लागू होत नाही.

national medical commission will form expert committee to improve and standardize PG courses
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या गुणवत्ता वाढीसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करणार,राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून प्राध्यापकांना सहभागी होण्याचे आवाहन
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Superstition Eradication Committee to launch courses for public education against superstition
अंधश्रद्धाविरोधी लोकशिक्षणासाठी अंनिस अभ्यासक्रम सुरू करणार
Guidance for 10th-12th students State Board appoints counsellors
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन… राज्य मंडळाकडून समुपदेशकांची नियुक्ती
Forest dept probes elephant procession in Pirangut
आमदाराची हत्तीवरून मिरवणूक कार्यकर्त्यांना महागात; संयोजकासह सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षावर गुन्हा
private hospital news in marathi
राज्यभरातील खासगी रुग्णालयांची झडती… आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनंतर आता…
response , students , Atal, initiative , CET cell ,
सीईटी कक्षाच्या ‘अटल’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
rules for RTE admissions Change, Committee Education Department
आरटीईच्या प्रवेशांसाठीच्या नियमांमध्ये होणार बदल… शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना

हेही वाचा – मंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्ह्यात अनोखा विक्रम

याउलट पहिल्या वर्षापासूनच अध्यापन न करता विद्यार्थ्यांना रुग्णालयात सर्व महिन्यांमध्ये सेवा देण्यासाठी भाग पाडले जाते. एकिकडे मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असताना अभ्यासक्रमाचे शुल्क मात्र दरवर्षी वाढतच असल्याचे अभाविपने म्हटले आहे. आंदोलनावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी थेट रुग्णवाहिका विद्यापीठात आणली. यावेळी विद्यापीठाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी भ्रमणध्वनीवरुन विद्यार्थ्यांशी संवाद साधून मागण्यांविषयी २८ जानेवारी रोजी अभाविपचे कार्यकर्ते, विद्यार्थी प्रतिनिधी आणि अधिकारी अशी एकत्रित बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी विद्यार्थ्यांशी दृकश्राव्य संवाद साधत विद्यापीठस्तरीय सर्व प्रश्न सोडविण्यासाठी २४ जानेवारी रोजी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

हेही वाचा – नंदुरबारमध्ये पोलिसांवर दगडफेकप्रकरणी १८ जण ताब्यात

आंदोलनात अभाविपचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी, प्रदेश सहमंत्री ओम मालुंजकर आणि मेघा शिरगावे, नाशिक महानगर सहमंत्री यश गुरव, व्यंकटेश अवसरकर आदींसह सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निमवैद्यकीयचे शिक्षण घेणारे विद्यार्थी उपस्थित होते.

Story img Loader