Premium

नाशिक भाजप महिला आघाडीत १० उपाध्यक्ष, आठ चिटणीस, तीन सरचिटणीस; सर्वांच्या समाधानाचा प्रयत्न

भाजपच्या शहर कार्यकारिणीप्रमाणे महिला आघाडीची विशाल कार्यकारिणी जाहीर झाली आहे.

Nashik BJP Mahila Aghadi has 10 vice-presidents eight secretaries and three general secretaries
कार्यकारिणीत पदाधिकाऱ्यांना अधिकाधिक स्थान देऊन सर्वांचे समाधान करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते. (फोटो- संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : भाजपच्या शहर कार्यकारिणीप्रमाणे महिला आघाडीची विशाल कार्यकारिणी जाहीर झाली आहे. महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सोनाली ठाकरे तर, १० उपाध्यक्ष करण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर आठ चिटणीस आणि संघटनेत सर्वात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या सरचिटणीसपदी तीन कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप नाशिक महानगर महिला आघाडीची २०२३-२०२६ कालावधीसाठी कार्यकारिणी शहराध्यक्ष प्रशांत जाधव आणि महिला आघाडी अध्यक्षा सोनाली ठाकरे यांनी जाहीर केली. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कार्यकारिणीत पदाधिकाऱ्यांना अधिकाधिक स्थान देऊन सर्वांचे समाधान करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते. पक्षाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून या कार्यकारिणीला अंतिम स्वरुप देण्यात आले.

आणखी वाचा-अमली पदार्थ तस्करी प्रकरण: भूषण पाटील, अभिषेक बल्लाठ यांना पोलीस कोठडी

कार्यकारिणीत १० उपाध्यक्ष असून यात तेजश्री काठे, प्रतिभा पवार, रोहिणी दळवी, स्वाती वटारे, उषा बेंडकुळे, पूनम ठाकुर, शोभा सोनवणे, ललिता भावसार, शोभा जाधव, वैशाली दराडे यांचा समावेश आहे. पक्ष संघटनेत सरचिटणीस हे महत्वाचे पद मानले जाते. त्यामुळे पूर्वीपासून कार्यरत अर्थात निष्ठावंतांना ती जबाबदारी दिली गेली. सरचिटणीसपदी रश्मी हिरे-बेंडाळे, सोनल दगडे, ज्योती चव्हाणके यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यकारिणीत आठ चिटणीस असून कार्यकारिणी सदस्य म्हणून ४३ कार्यकर्तींना स्थान देण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nashik bjp mahila aghadi has 10 vice presidents eight secretaries and three general secretaries mrj

First published on: 07-12-2023 at 15:09 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा