नाशिक : जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी पाच ते २० जुलै या कालावधीत मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात ९० हून अधिक विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला. त्यापैकी ६० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. निफाड तालुक्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने नुकतीच शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम राबविण्यात आली. वाडी, वस्ती, वीटभट्टी, द्राक्ष मळे, कांदा चाळ यासह अन्य ठिकाणी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला. यासाठी जिल्ह्यातील पाच लाख २५ हजार ९०७ कुटूंबाचे सर्व्हेक्षण करण्यात आले. यासाठी १० हजारांहून अधिक कर्मचारी काम करत होते. या मोहिमेत ९२ शाळाबाह्य विद्यार्थी आढळले. निफाड, मालेगाव तालुक्यात ही संख्या अनुक्रमे ३० आणि २० इतकी आहे.
हेही वाचा…नंदुरबार जिल्ह्यात सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर पाणी
मालेगाव येथे हातमागासह अन्य कारखाने आहेत. या ठिकाणी बालमजूरही काम करतात. निफाड परिसरात शेती तसेच वीटभट्टीच्या कामावर स्थलांतरीत मजूर येतात. या बालकांचा शोध घेत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या मोहिमेद्वारे होत आहे. यातील ६९ बालकांना शाळेत दाखल करण्यात आले असून त्यांच्या पालकांकडून हमीपत्र भरून घेण्यात आले. यातील ३७ बालके ही स्थलांतरीत आहेत. दोन बालकांना शिक्षण हमीपत्र देण्यात आले असून अन्य बालकांना शाळेत दाखल करण्याचे काम सुरू आहे.