नाशिक: कॅन्सर हा आजार अजूनही भारताच्या सार्वजनिक आरोग्याशी निगडित सर्वात महत्त्वाच्या समस्येच्या रूपात पुढे येत आहे. त्याचबरोबर महानगरांच्या पलीकडेही सहजप्राप्त, सातत्यपूर्ण व रुग्णकेंद्री कर्करोग देखभाल केंद्र उपलब्ध होण्याची गरज अधिकच ठळकपणे लक्षात येऊ लागली आहे. आयसीएमआर-एनसीडीआयआरच्या महाराष्ट्र कॅन्सर प्रोफाइलनुसार २०२६ साली राज्यामध्ये कॅन्सरच्या १.३० लाख नवीन रुग्णांची नोंद होईल, असा अंदाज आहे, पुरुष गटात ही संख्या ६१,७०३ इतकी असून स्त्रियांमध्ये ही संख्या ६८,७६२ इतकी आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कॅन्सरशी संबंधितांना दिलासा देण्याचे काम कॅन्सर हिलर सेंटरने होणार आहे.

कॅन्सर हा शब्द उच्चारला तरी भले भले हादरतात. कारण, आजही कॅन्सर म्हणजे बरा न होणारा आजार, अशी अनेकांची समजूत आहे. महाराष्ट्रामध्ये कर्करोगाशी तंबाखूचा वापर, अप्रत्यक्षपणे धूम्रपानाच्या सान्निध्यात येणे, लठ्ठपणा आणि आरोग्याला असलेले जीवनशैलीशी निगडित धोके प्रामुख्याने आढळून येतात. वेळीच मिळालेले मार्गदर्शन, लवकरात लवकर आलेली सुस्पष्टता आणि देखभालीत राखले गेलेले सातत्य यामुळे सर्वच कॅन्सर रुग्णांच्या उपचार चक्रावर लक्षणीय प्रभाव पडू शकतो.

कर्करोग उपचारांचे बरेचसे ओझे तुलनेने मोठी शहरेच वाहत असताना, नाशिकसारखी प्रादेशिक केंद्रे अत्यंत महत्त्वाची ठरू लागली आहेत. त्यामुळे ज्या रुग्णांच्या कुटुंबांना वारंवार मोठ्या शहरांकडे प्रवास न करता तज्ज्ञांकडून निर्णायक मत हवे आहे, चालू पातळीवरील देखभाल, रिपोर्ट्सचे मूल्यमापन व सहाय्यकारी देखभाल हवी आहे, त्यांच्यासाठी कॅन्सर हिलर सेंटरने मदतीचा हात दिला आहे.

कॅन्सर हिलर सेंटरने नाशिक येथे काॅलेज रोडवरील सिद्धी पूजा ट्रेड सेंटरच्या तिसऱ्या मजल्यावर आपले नवे केंद्र सुरू केल्याची घोषणा केली आहे. हे संस्थेचे भारतातील २७ वे केंद्र आहे. कर्करोगाशी निगडित विशेषीकृत सल्ला, उपचारांचे व्यक्तीबरहुकुम केलेले नियोजन आणि नंतरची सेवा नाशिक, उत्तर महाराष्ट्र व लगतच्या भागांत राहणाऱ्या रुग्णांच्या व कुटुंबीयांच्या समीप आणणे, हा या विस्ताराचा प्रमुख हेतू आहे.

नाशिकचे केंद्र कॅन्सरच्या रुग्णविशिष्ट स्वरूपावरही लक्ष केंद्रित करेल. या उपचारांना रोगप्रतिकारशास्त्र अर्थात इम्युनोलॉजीमधील ज्ञानावर आधारित दृष्टिकोनाचा पाया असेल. त्यात मुख्यत्वे रुग्णाच्या आजाराचे स्वरूप, त्याच्या आरोग्याची स्थिती, रोगप्रतिकारशक्ती, आजवर केलेल्या उपचारांचा पूर्वेतिहास आणि एकूण जीवनमानाचा दर्जा या बाबी समजून घेण्यावर भर असेल.

कॅन्सर हिलर सेंटरची कार्यपद्धती ही प्रामुख्याने कॅन्सर हिलर थेरपी या एकात्मिक कॅन्सर केअर प्रोटोकॉलच्या भोवती उभारली गेलेली आहे, जी इम्युनोथेरपी व कर्करोगाच्या उपचारांमध्ये शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीच्या प्रतिसादाला आधार देण्याच्या संकल्पनेशी अत्यंत चांगला मेळ साधणारी आहे. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी कॅन्सर हिलर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. तरंग कृष्णा म्हणाले, “आज कॅन्सरची देखभाल ही फक्त आजारावरील उपचारांपुरती मर्यादित राहिलेली नाही; तर यात रुग्णाला सुस्पष्टता, आत्मविश्वास पुरविणे आणि त्यांच्या संपूर्ण उपचारांच्या कालावधीत सातत्य राखणे या गोष्टीही महत्त्वाच्या ठरत आहेत.

अनेक प्रादेशिक स्तरावरील शहरांत कुटुंबांना आजही विलंबाचा सामना करावा लागतो, कारण विशेषीकृत मार्गदर्शन एकतर खूप दूर उपलब्ध असते किंवा ते मिळविणे अवघड असते. नाशिक केंद्राच्या साथीने रुग्णकेंद्री, इम्युनोलॉजीचे ज्ञान वापरणारी कॅन्सर देखभाल लोकांच्या जवळ आणणे हे आमचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.