नाशिक: पालिकेची पोस्टर हटाओ मोहीम जोरात सुरू

आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी कारवाई

Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
राजुरा इथे हरिनाम सप्ताह सुरु आहे. या सप्ताहामध्ये जेवणानंतर काही मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला.

नाशिकमध्ये पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शहरात ठिकठिकाणी लागलेली राजकीय पक्षांची पोस्टर्स,बॅनर्स हटवण्याची जोरदार मोहीम हातात घेतली आहे. आतापर्यंत एकूण ६१८० पोस्टर्स, बॅनर्स आणि झेंडे या विभागाने हटवले आहेत.

राज्यातल्या इतर महानगरपालिकांबरोबरच नाशिक महानगरपालिकेची निवडणूक २१ जानेवारीला होते आहे. सध्या आचारसंहिता लागू आहे. या कालावधीत राजकीय पक्षांनी  बॅनर्स, पोस्टर्स आणि झेंडे लावायला बंदी असते.तरीही शहरात अनेक ठिकाणी अशी पोस्टरबाजी सुरू आहे.

निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार महानगरपालिकेने जोरात कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई अशीच पुढे सुरू राहणार असल्याचं पालिकेतर्फे सांगण्यात आलं.

पालिकेकडून करण्यात येणाऱ्या या कारवाईचं नाशिककरांकडून स्वागत करण्यात येतंय. गेल्या काही महिन्यांमध्ये सुरू झालेल्या पोस्टरबाजीला नाशिककर कंटाळले होते. ठिकठिकाणी लागलेल्या या पोस्टर्स आणि बॅनर्समुळे शहर विद्रूप होत असल्याची रास्त भावना नाशिकमध्ये होती. आता ही पोस्टर्स काढण्याची धडक कारवाई पालिका करत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे.

नाशिकमधल्या पालिका निवडणुकांकडे सगळ्या राज्याचं लक्ष आहे. मनसेची सत्ता असलेल्या नाशिक पालिकेत आपलं स्थान कायम ठेवण्याचं आव्हान राज ठाकरेंकडे आहे. मुंबई महापालिकेत सेना-भाजप युतीमध्ये बेबनाव झाल्याने नाशिकमध्येही काय स्थिती तयार होणार याविषयी उत्सुकता आहे. नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो. पण नाशिकमध्येही मनसेला खिंडार पडतंय की काय अशी स्थिती निर्माण झालीये. मनसेचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी पक्ष सोडून गेले आहेत. मनसेचं होमपीच समजलं जाणाऱ्या नाशिकमध्येच जर मनसेला धक्का बसला तर यानंतर मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसे काय करणार असा प्रश्न विचारला जातोय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nashik corporation takes action on illegal hoardings

ताज्या बातम्या