Nashik Crime : नाशिक येथील नाशिक रोड भागात असलेल्या सिन्नरफाटा भागात यश टायर्स या दुकानासमोर एका ३८ वर्षीय तरुणावर हल्ला करुन तीन ते चार जणांनी त्याची हत्या केली. प्रमोद वाघ असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. नाशिक हे शहर महाराष्ट्रातलं तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वर या मंदिरांमुळे नाशिकला एक धार्मिक पार्श्वभूमी आहे. मात्र मागील काही वर्षांमध्ये या ठिकाणी गुन्हेगारी वाढल्याचं दिसून येतं आहे. आता तर तरुणाची हत्या झाल्याची घटना आणि त्या घटनेचं सीसीटीव्ही समोर आलं आहे.

नेमकी काय घटना घडली?

नाशिकच्या सिन्नर फाटा या भागात यश टायर्स हे दुकान आहे. २ ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्रमोद वाघ हा तरुण दुचाकीवरुन चालला होता. त्यावेळी योगेश पगारे आणि त्याच्या साथीदारांनी या तरुणाला अडवलं. त्याच्याबरोबर झालेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढून त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी एकाने प्रमोद वाघवर रॉडने हल्ला ( Nashik Crime ) केला. तसंच इतरांनीही त्याला मारहाण केली आणि त्याच्यावर वार केले. या घटनेत ( Nashik Crime ) प्रमोद वाघ जखमी झाला. त्याला या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

हे पण वाचा- Success Story: UPSC परीक्षेच्या तयारीदरम्यान झाली वडिलांची हत्या; तरीही खचून न जाता वडिलांचे स्वप्न केले पूर्ण अन् परीक्षेत मिळवला ४५४ वा क्रमांक

सीसीटीव्ही फुटेजमध्ये हत्येचा थरार समोर

नाशिकच्या सिन्नर फाटा भागात प्रमोद वाघवर जेव्हा हल्ला ( Nashik Crime ) झाला त्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. मात्र तो वाद काय होता? हे समजू शकलेलं नाही. प्रमोद वाघ रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ही घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात पुढील तपास सुरु असल्याचं नाशिक रोड पोलिसांनी सांगितलं. अत्यंत निर्घृणपणे ही हत्या झाली ( Nashik Crime ) हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं आहे.

प्रमोद वाघ रक्ताच्या थारोळ्यात

प्रमोद वाघ या इसमावर जो हल्ला झाला त्यानंतर पगारे आणि इतर तरुण फरार झाले. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रमोद वाघला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रमोद वाघच्या डोक्याला हल्ल्यात ( Nashik Crime ) गंभीर दुखापत झाली. त्याची प्रकृती चिंताजनक होती उपचारांच्या दरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला.

युवकाच्या हत्येने नाशिक हादरलं, पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरु

पोलिसांकडून या प्रकरणाचा शोध सुरु

प्रमोद वाघ या तरुणावर हल्ला का झाला? ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि गुन्हे शाखेचे कर्मचारी आता योगेश पगारे आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. नाशिकसारख्या ठिकाणी झालेल्या या घटनेने परिसरात तणावाचं आणि दहशतीचं वातावरण आहे.