MLC Election Result live: राज्यात आज शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजीणी सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरू असून, तीन फेऱ्या संपल्यानंतरही सत्यजित तांबे आघाडीवर असून, ते विजयी होतील असे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवरच स्वत: सत्यजित तांबे यांनी केलेल्या एका ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणुकीत विजयी झाल्यानंतरही विजोयोत्सव साजरा न करण्याचे सत्यजित तांबे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. आपण हा निर्णय का घेतला यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – नाशिकच्या निकालाआधी सत्यजित तांबे यांनी गमावला जवळचा सहकारी; मानस पगार यांचे अपघाती निधन

सत्यजित तांबे ट्वीटद्वारे म्हणतात, “विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत, पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही. सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा. मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती.”

हेही वाचा – बॅलेटवर निवडणुका घेण्यासंदर्भात अमोल मिटकरींनी भाजपाला उद्देशून केलेल्या विधानावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया, म्हणाले…

या अगोदर सत्यजित तांबे यांनी ट्वीटरवर मानस पगार याच्यासोबतचा फोटो शेअर करत, भावपूर्ण श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. “भावपूर्ण श्रद्धांजली, माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे.” असं सत्यजित तांबेंनी ट्वीट केलं आहे.

हेही वाचा – Maharashtra Latest Breaking News Today : अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी; भाजपाचा पराभव

नाशिकमधील उमेदवार निवडीवरून अनेक राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी यावरून बंडखोरी करत थेट अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळाली. यासह अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि कोकण अशा एकूण पाच पदवीधर-शिक्षक मतदारसंघांचाही आज निकाल लागत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik graduate constituency election we will not celebrate victory satyajit tambe announced msr
First published on: 02-02-2023 at 21:14 IST