नाशिक : राजसत्ता आणि धर्मसत्ता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असावा. मात्र, राजसत्तेने धर्मसत्तेत हस्तक्षेप करू नये, असे प्रत्युत्तर नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. महाराजांनी महायुतीकडून नाशिक लोकसभेची उमेदवारी मिळू न शकलेले अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि भाजपचे दिनकर पाटील यांची शुक्रवारी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. भुजबळांना तर त्यांनी बादली हे आपले चिन्ह भेट स्वरुपात दिले.

नाशिक लोकसभेची निवडणूक शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीने चुरशीची झाली आहे. त्यांच्या माघारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केले. अलीकडेच नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अनिष्ठान केव्हाही वरचे असते, महाराजांनी राजकीय कार्यकर्त्यांना आशीर्वाद देण्याच्या भूमिकेत असले पाहिजे, असे सुचविले होते. त्यास उत्तर देताना महाराजांनी राजकारणात आलो म्हणजे आपण अध्यात्म सोडलेले नसल्याचे सांगितले. राजकारणात अध्यात्माचे तत्व रुजविण्यासाठी या क्षेत्रात आल्याचे स्पष्ट केले. महायुतीत नाशिकच्या जागेवरून तीनही पक्षात वाद झाले होते. अखेरीस शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाली.

Eknath Shinde order to office bearers to start preparations for Legislative Assembly election
विधानसभेच्या तयारीला लागा; मुख्यमंत्र्यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश; बुधवारी वर्धापन दिन
keshav upadhye replied to anil deshmukh allegation
“माजी गृहमंत्र्याचा अभ्यास कायद्याचा नसून केवळ १०० कोटींच्या वसुलीचा, त्यामुळे…”; अनिल देशमुखांच्या ‘त्या’ आरोपाला भाजपाचं प्रत्युत्तर!
Prema Khandu scored a hat trick
प्रेमा खांडूंनी मारली हॅटट्रिक! अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाला मोठा विजय मिळवून देणारे तरुण मुख्यमंत्री
narendra modi
नव्या रालोआपर्वाची सुरुवात; राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात भव्य शपथविधी सोहळा
Prataprao Jadhav, buldhana lok sabha seat, PM Modi cabinet, Union cabinet, cabinet swearing in, Prataprao Jadhav, Prataprao Jadhav going to be Union Minister, Prataprao Jadhav union minister in Narendra modi cabinet, Prataprao Jadhav political journey, shivsena, Eknath shinde shivsena,
ओळख नवीन खासदारांची : खासदार प्रतापराव जाधव (शिवसेना), बुलढाणा; सामान्य शिवसैनिकाला मंत्रिपदाची संधी
Sattar admits that Bharatiya Janata Party is not helping us for elections
दानवेंचे काम न केल्याची सत्तार यांची कबुली
Kolhapur Lok Sabha seat, Chhatrapati Shahu Maharaj, Chhatrapati Shahu Maharaj Triumphs Over Sanjay Mandlik, Chhatrapati Shahu Maharaj Secures Victory, targeting Gadi, Kolhapur gadi, congress, satej patil, shivsena,
कोल्हापुरात ‘गादी’ला घेरण्याची रणनीती विरोधकांवरच उलटली
BJP management skills support Sandipan Bhumre
छत्रपती संभाजीनगर: भाजपच्या व्यवस्थापन कौशल्याची भुमरे यांना साथ

हेही वाचा…नाशिक : वादळी पावसाने घरे, कांदा चाळीचे नुकसान; झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा विस्कळीत

उमेदवारीच्या स्पर्धेत राहिलेल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याकडे सध्या महाराजांचा कल आहे. भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांची भेट घेतल्यानंतर महाराजांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची भुजबळ फार्म येथे भेट घेऊन चर्चा केली. मतदारांच्या गाठीभेटी घेणे हे उमेदवाराचे कर्तव्य असल्याचे महाराजांनी नमूद केले. बादली हे चिन्ह भेट दिल्यावर भुजबळांना अतिशय आनंद झाला, बादली खूप आवडल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीत भुजबळांकडून मदत मागण्याची गरज नाही. कुठलीही निवडणूक असो, ते आम्हाला भेटत असतात, असे महाराजांनी सूचित केले. या भेटीवर भुजबळांनी फारसे भाष्य केले नाही. निवडणुकीत उमेदवार सर्वांच्या गाठीभेटी घेत असतात. यात काहीही वावगे नसल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा…नरहरी झिरवळ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर ?

सात मतदारसंघात जय बाबाजी भक्त परिवाराचा प्रभाव

सध्याचे राजकारण चिंतेचा विषय झाला आहे. राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी तरुणांना व्यसनाच्या आहारी लावत आहेत. अनेक प्रकारचे प्रलोभन दाखवत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. हे कृत्य लोकशाही मोडीत काढण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप करुन शांतिगिरी महाराजांनी चांगल्या मार्गाने निवडणूक लढता येते हे जय बाबाजी भक्त परिवार सिध्द करीत असल्याचे सांगितले. राज्यात नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, जालना, दिंडोरी, शिर्डी आदी सात लोकसभा मतदारसंघात आपला भक्त परिवार निर्णायक भूमिकेत आहे. या मतदारसंघात नागरिकांनी समाजहित, धर्महित व देशहिताचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.