नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी चार-पाच वर्षाचा कालावधी लागतो. आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी केवळ दोन वर्षाचा कालावधी राहिला आहे. नियोजनाला उशीर होत असल्याने त्यास गती देण्याकरिता पुढील आठवड्यात सिंहस्थाची स्थानिक पातळीवर विस्तृत बैठक होणार आहे. तसेच साधुग्रामसाठी जागा देणाऱ्या शेतकऱ्यांऐवजी काही विशिष्ट घटकांना भूसंपादनापोटी कोट्यवधीचा मोबदला दिला गेला. याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

याबाबतची माहिती आगामी कुंभमेळ्याची जबाबदारी सांभाळणारे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. कुंभमेळ्याच्या तयारीचा अभ्यास करण्यासाठी अधिकारी प्रयागराजचा दौरा करणार आहेत. कुंभमेळा नियोजनास विलंब होत असल्याची भावना प्रशासकीय वर्तुळातून उमटत आहे. या कामांना विलंब व्हायला नको म्हणून सर्व विषयांवर तातडीने विस्तृत स्वरुपाची बैठक घेतली जाणार आहे.

reserve bank of india marathi news
विश्लेषण : रिझर्व्ह बँकेकडून यंदा व्याजदर कपात निश्चित?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
26 highly dangerous buildings in Thane are occupied by residents municipality issued notices four months in advance
ठाण्यात २६ अतिधोकादायक इमारती रहिवास व्याप्त, चार महिने आधीच खबरदारी घेत पालिकेने बजावल्या नोटीसा
Navi Mumbai budget likely to avoid tax hikes ahead of upcoming municipal elections
नवी मुंबईकरांना यंदाही ‘करदिलासा’? आगामी पालिका निवडणुकांमुळे अर्थसंकल्पात करवाढ नसण्याची शक्यता
mhada nashik lottery
म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ४९३ घरांसाठी मार्चमध्ये सोडत, २० टक्के योजनेतील घरांसाठी दोन ते तीन दिवसांत जाहिरात
Maharashtra Kesari 2025
Maharashtra Kesari 2025 : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी; सोलापूरचा महेंद्र गायकवाड पराभूत
nashik Crowd management preparations for Kumbh Mela are based on Ramani Commissions reports
नाशिकच्या कुंभमेळ्यातील गर्दी व्यवस्थापनासाठी रमणी अहवालाचा आधार
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी

हेही वाचा – नाशिक अपघातास कारणीभूत तिघांविरुध्द गुन्हा, सळई पुरवठादाराचाही समावेश

साधुग्रामसाठी संपादीत केलेल्या जागांचा मोबदला देणे आवश्यक आहे. मधल्या काळात भूसंपादनापोटी दुसऱ्या लोकांना पैसे दिले गेले. ज्या जागेची गरज नाही, त्या जागेचे पैसे दिले. साधुग्रामच्या जागेवर आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यांना मात्र पैसे दिले गेले नाही. नियमाला बगल देत ज्यांना भूसंपादनाचे कोट्यवधी रुपये दिले गेले, त्यांना शोधून काढले जाईल. महानगरपालिकेच्या संशयास्पद भूसंपादनाची चौकशी पुढील काही दिवसात होईल. त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे महाजन या्ंंनी संगितले.

हेही वाचा – निर्यात शुल्कविरोधात कांदा उत्पादक आक्रमक, लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले

संक्रांतीनंतर पालकमंत्रीपदाचा निर्णय

मकर संक्रातीनंतर पालकमंत्रीपदांचा निर्णय राज्यात पालकमंत्र्यांची घोषणा व्हायला उशिर झाला असला तरी मकरसंक्रांतीनंतर याबाबत निर्णय होईल, असे महाजन यांनी म्हटले आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी (अजित पवार), भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. नाशिक दौऱ्यावर आलेल्या महाजन यांनी आपण काही ती सूत्रे घ्यायला आलेलो नाही, असे मिश्किलपणे सांगितले.

Story img Loader