नाशिक – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने नऊ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता गंगापूर रोडवरील बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात नाशिक, मुंबई, पुणे येथील २७ पेक्षा अधिक कंपन्या दोन हजार रिक्त पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत.
बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी जिल्हा कौशल्य विकासच्या वतीने विविध माध्यमातून प्रयत्न होत आहेत. गुरूवारी आयोजित मेळाव्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा नाशिक, बॉश लिमिटेड, नाशिक, जेके मैनी प्रिसिजन टेक्नॉलॉजी लिमिटेड, युवाशक्ती स्किल इंडिया प्रा., एस्टेमो इंडिया प्रा. लि, एमएसएल ड्राइव्हलाइन सिस्टम्स लिमिटेड , बजाज सन्स लि, आनंद आय-पॉवर,. ऐन्डुरंन्स टेक्नोलॉजीस, टपरिया टूल्स लि. ,मदरसन ऑटोमोटिव्ह इंजिनियरिंग, धुमल इंडस्ट्रिज इंडिया प्रा. लि, . किम्पलास पाइपिंग सिस्टीम्स लिमिटेड, एमडी इंडस्ट्रिज, नाशिक, मॉसडोर्फर इंडिया प्रा. लि, नोव्हेचर इलेक्ट्रिकल आणि डिजिटल (लेग्रँड), वैष्णवी ऑटो (पा.) लि., फार्मा कंपनीज इन कोकंण टँड गोवा, ब्लुस्टर्स लि., टाटा कुमिन्स, गॅबरिल इंडिया प्रा.लि., .एसएमएस पुणे, महिंद्रा अँड महिंद्रा, पुणे, रिंग प्लस ॲक्युवा, सिन्नर, एम.आर.एफ., धेज गुजरात, अमेझॉन, भिवंडी, इक्विटास स्माॉल फायनान्स बँक अशा एकूण २७ पेक्षा जास्त कंपन्या/ आस्थापना व त्यांचे प्रतिनिधी एकूण २००० पेक्षा जास्त रिक्तपदासाठी प्रत्यक्ष मुलाखत घेणार आहेत.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास http://www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ॲप्लाय करावे.तसेच, उक्त नमुद ठिकाणी उपस्थित राहुन प्रत्यक्ष मुलाखती देऊन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. काही अडचणी आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या ०२५३- २९९३३२१ या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्तांनी केले आहे.
