नाशिक – आनंदवलीतील दर्ग्यासह अन्य धार्मिक स्थळांची पाहणी करून त्या ठिकाणी जर अतिक्रमण झाले असेल तर काढण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली. 

हेही वाचा – नाशिक: अपघातानंतर गतिरोधकासाठी नांदुरीत रास्ता रोको

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

हेही वाचा – मालेगावातील सभेसाठी नाशिकचे बळ; उद्धव ठाकरे गटाकडून २० हजार कार्यकर्त्यांचे नियोजन

बुधवारी येथे सकल हिंदू समाजातर्फे हिंदू हुंकार सभा झाली. सभेत सुदर्शन राष्ट्रनिर्माण ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांनी आनंदवली दर्ग्याचा मुद्दा मांडला होता. याविषयी आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांना पत्रकारांनी विचारले असता दर्ग्यासह शहर परिसरातील अन्य धार्मिक स्थळांची पाहणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी अतिक्रमण असेल त्यावर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी नमूद केले. दरम्यान, गुरुवारी चव्हाणके यांनी आनंदवलीतील दर्ग्यास भेट दिली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रियाज शेख यांनी सभेतील वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे सांगितले. तसेच चव्हाणके यांच्या पाहणीनंतरही या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत