scorecardresearch

Premium

Nashik Municipal Election Results 2017: नाशिकमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत; ६७ जागांसह सत्तेचा कुंभ ताब्यात

नाशिकमध्ये भाजपची जोरदार मुसंडी

devendra fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिकमधील सत्तेचा कुंभ कोणाकडे असणार, याचे उत्तर नाशिककरांनी दिले आहे. राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांना नाशिककरांनी संधी दिली आहे. भाजपने १२२ पैकी ६७ जागांवर विजय मिळवत नाशिक महापालिकेवर झेंडा फडकवला आहे. तर गेल्या निवडणुकीत तब्बल ४० जागांवर विजय मिळवणाऱ्या मनसेला फक्त ५ जागांवर यश मिळाले आहे. तर शिवसेनेला ३४ जागा जिंकण्यात यश आले आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…

निवडणुकीच्या तोंडावर झालेले इनकमिंग, गुंडांना पक्षात देण्यात आलेला प्रवेश, तिकीटासाठी पैसे घेतल्याचा झालेला आरोप आणि त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप्स यामुळे भाजप नाशिकमध्ये वादग्रस्त ठरला होता. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपने नाशिकमध्ये जोरदार मुसंडी मारली आणि नाशिकची सत्ता काबीज केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नाशिकमध्ये एकत्र निवडणूक लढवली. मात्र या दोन्ही पक्षांना एकत्रित मिळून जेमतेम दोन आकड्यांपर्यंत मजल मारता आली.

मी नाशिकला दत्तक घेऊन शहराचा विकास करेन, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. नाशिककरांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. गेली पाच वर्षे सत्तेत असलेल्या मनसेची मात्र या निवडणुकीत धूळधाण उडाली आहे. मनसेला अवघ्या ५ जागांवर यश मिळवता आले आहे.

 

दिवसभरातील ठळक घडामोडी:

६.४७: शिवसेनेला ३४, काँग्रेसला ६, राष्ट्रवादी, मनसे आणि इतरांना प्रत्येकी ५-५ जागा

६.३५ भाजपला ६७ जागांसह स्पष्ट बहुमत

५.३२: भाजपची बहुमताच्या दिशेने दमदार वाटचाल

५.२०: भाजप ५५, शिवसेना ३५, काँग्रेस ६, राष्ट्रवादी ५, मनसे ३

५.०४: भाजप ५४, शिवसेना ३३, काँग्रेस ६, राष्ट्रवादी ४, मनसे ३

४.५७: मनसेचा दारुण पराभव

४.४८: राज्यातील सत्ताधारी पक्षच ठरले नाशिकमधील मोठे पक्ष

४.३१: काँग्रेस-राष्ट्रवादीची धूळधाण, मनसेचेदेखील पानीपत

४.१७: भाजपची जोरदार मुसंडी; भाजपचा अश्वमेध रोखण्यात शिवसेनेला अपयश

४.०९: भाजपची बहुमताकडे वाटचाल, ५० जागांवर विजय निश्चित, बहुमताच्या आकड्यापासून १२ जागा दूर

४.०२: भाजप ५१, शिवसेना ३३, काँग्रेस ६, राष्ट्रवादी ४, मनसे ३ जागांवर आघाडीवर

३.४५: भाजप ४५, शिवसेना ३२, काँग्रेस ६, राष्ट्रवादी ५, मनसे २ जागांवर आघाडीवर

३.३७: प्रभाग २६ मधील विजयी उमेदवार- दिलीप दातीर (शिवसेना), हर्षदा गायकर (शिवसेना), अलका आहिरे (भाजप), भागवत आरोटे (शिवसेना)

३.२९: प्रभाग २९ मधील विजयी उमेदवार- छायाताई देवांग (भाजप), रत्नमाला राणे (शिवसेना), मुकेश शहाणे (भाजप), निलेश ठाकरे (भाजप)

३.२३: नाशिक मनसेचे गटनेते अनिल मटाले यांचा दारुण पराभव; प्रभाग २५ मध्ये शिवसेनेच्या श्यामकुमार साबळेंकडून पराभव

३.१६ प्रभाग २७ मधील विजयी उमेदवार- राकेश दोदे (भाजप), किरण गामने (भाजप), कावेरी घुगे (शिवसेना), चंद्रकांत खाडे (शिवसेना)

३.०८:  प्रभाग २५ मधील विजयी उमेदवार- सुधाकर बडगुजर (शिवसेना), हर्षा बडगुजर (शिवसेना), भाग्यश्री ठोमसे (भाजप), श्यामकुमार साबळे (शिवसेना)

३.०१: प्रभाग २१ मधील विजयी उमेदवार कोमल मेहोरिलिया (भाजप), रमेश धोंगडे (शिवसेना), शाम खोले (शिवसेना), सूर्यकांत लवटे (शिवसेना)

२.५३: भाजप ४२, शिवसेना २८, काँग्रेस ६, राष्ट्रवादी ५, मनसे ३ जागी आघाडीवर

२.४४: प्रभाग २० मधील विजयी उमेदवार- अंबादास पगारे, सीमा ताजणे, संगीता गायकवाड, संभाजी मोरूस्कर (सर्व भाजप) 

२.३९: प्रभाग १७ मधील विजयी उमेदवार- दिनकर आढाव (भाजप), अनिता सातभाई (भाजप), प्रशांत दिवे (शिवसेना), मंगला आढाव (शिवसेना)

२.३३: प्रभाग १३ मधील विजयी उमेदवार- गजानन शेलार (राष्ट्रवादी), वत्सला खैरे (काँग्रेस), शाहू खैरे (काँग्रेस), सुरेखा भोसले (मनसे)

२.२५: प्रभाग ८ मधील विजयी उमेदवार- नयना गांगुर्डे, राधा बेंडकुळे, संतोष गायकवाड, विलास शिंदे (सर्व भाजप)

२.१८: प्रभाग ४ मधील विजयी उमेदवार- हेमंत शेट्टी, शांताबाई हिरे, सरिता सोनवणे, जगदीश पाटील (सर्व भाजप)

२.१२: प्रभाग १ मधील विजयी उमेदवार- रंजना भानसी, अरूण पवार, गणेश गीते, पूनम धनगर (सर्व भाजप)

२.०५: भाजपची जोरदार मुसंडी; मनसेची धूळधाण

२.०५: भाजप ४०, शिवसेना २२, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी ६ तर मनसे दोन जागांवर पुढे

१.५८: प्रभाग ७ ड मधून भाजपचे योगेश हिरे विजयी

१.५७: प्रभाग ७ क मधून भाजपच्या स्वाती भामरे विजयी

१.५६: प्रभाग ७ ब मधून भाजपच्या हिमगौरी आहेर विजयी

१.५५: प्रभाग ७ अ मधून शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांचा विजय

१.५४: भाजप २४ जागांवर आघाडीवर, शिवसेना १३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे प्रत्येकी २ जागी आघाडीवर

१.४८: प्रभाग १७ ड मधून भाजपचे दिनकर आढाव विजयी

१.४४: प्रभाग १७ क मधून भाजपच्या सुमन सातभाई यांचा विजय

१.४१: प्रभाग १७ ब मधून शिवसेनेच्या मंगला आढाव विजयी

१.३७: प्रभाग १७ अ मधून शिवसेनेचे प्रशांत दिवे विजयी

१.३४: भाजप २४, शिवसेना १३, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे प्रत्येकी २ जागी आघाडीवर

१.२५: प्रभाग २५ अ मधून भाजपचे सखाराम भामरे ७८२१ मतांनी आघाडीवर

१.१९: प्रभाग २५ ड मधून शिवसेनेचे श्यामकुमार साबळे विजयी

१.१४: प्रभाग २५ क मधून भाजपच्या भाग्यश्री ढोमसे विजयी

१.०९: प्रभाग २५ ब मधून शिवसेनेच्या हर्षा बडगुजर विजयी

१.०५: प्रभाग क्रमांक २५ अ मधून शिवसेनेचे सुधाकर बडगुजर विजयी

१.००: भाजप २२, शिवसेना १३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे एका जागी आघाडीवर

१२.५५: नाशिकमध्ये भाजपची जोरदार मुसंडी

१२.४८: भाजप २२, शिवसेना १३, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी २ तर मनसे एका जागी आघाडीवर

१२.४६: मनसेला मोठा धक्का; पालिकेतील सत्ता जाण्याची दाट शक्यता

१२.४०: भाजप २२, शिवसेना ७, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी २ तर मनसे एका जागी आघाडीवर

१२.३३: मनसेचे गटनेते अनिल मटाले पराभूत

१२.२८: प्रभाग १३ क मधून मनसेच्या सुरेखा भोसले विजयी

१२.२३: भाजप २२, शिवसेना ७, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी २ तर मनसे एका जागी आघाडीवर

१२.१८: प्रभाग १३ अ मधून राष्ट्रवादीच्या वत्सला खैरे १६१२ मतांनी पुढे

१२.१४: प्रभाग १३ ड मधून काँग्रेसचे शाहू खैरे १३०४ मतांनी आघाडीवर

१२.१३: प्रभाग ७ अ मधून शिवसेनेचे अजय बोरस्ते ३२११ मतांनी आघाडीवर

१२.१२: प्रभाग १३ ब मधून राष्ट्रवादीचे गजानन शेलार १९२६ मतांनी आघाडीवर

१२.११: प्रभाग १३ ड मधून काँग्रेसचे शाहू खैरे १२६१ मतांनी आघाडीवर

१२.१०: विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक पराभूत

१२.०५: भाजप २१ जागांवर आघाडी; शिवसेना ७, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी २ तर मनसे एका जागी आघाडीवर

१२.०१: भाजपच्या उमेदवाराकडून माजी महापौर यतीन वाघ यांचा पराभव

११.५९: शिवसेनेचे विलास शिंदे प्रभाग ८ ड मधून आघाडीवर

११.५७: प्रभाग ७ अ मध्ये शिवसेनेचे अजय बोरस्ते आघाडीवर

११.५४: प्रभाग २५ अ मधून शिवसेनेचे बडगुजर आघाडीवर

११.५०: भाजप १८, शिवसेना ७, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी २ तर मनसे एका जागी आघाडीवर

११.४४: प्रभाग १३ अ मध्ये स्नेहल चव्हाण १४८८ मतांनी, माधुरी जाधव १६१५ मतांनी, वत्सला खैरे १७७८ मतांनी, शेलार गजानन २१२४ मतांनी आघाडीवर

११.४१: दोन फेऱ्यांनंतर २७ अ मध्ये राकेश दोंदे (भाजप) आघाडीवर

११.३९: प्रभाग ७ मधून शिवसेनेचे अजय बोरस्ते आघाडीवर, भाजपचे हिरे, भामरे, आडके यांची आघाडी कायम

११.३७: भाजप १८, शिवसेना ७, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी २ जागांवर आघाडी

११.३३: प्रभाग २७ ब मधून चंद्रकांत खाडे आघाडीवर

११.२९: प्रभाग १७ अ मध्ये प्रशांत दिवे (शिवसेना), ब मध्ये मंगला आढाव (शिवसेना), क मध्ये आशा पवार (शिवसेना), ड मध्ये दिनकर आढाव (भाजप) आघाडीवर

११.२८: प्रभाग १३ मधून काँग्रेसचे शाहू खैरे, वत्सला खैरे, मनसेच्या सुरेखा भोसले, राष्ट्रवादीचे गजानन शेलार आघाडीवर

११.२६: भाजप १७, शिवसेना ५, काँग्रेस २, राष्ट्रवादी आणि मनसेची प्रत्येकी एका जागेवर आघाडी

११.२५: शिवसेनेच्या दादा भुसेंना मोठा धक्का; सातपैकी पाच जागांवर भाजपचा विजय

११.२४: प्रभाग क्र ७ ब मध्ये भाजपच्या हिमगौरी बाळासाहेब आहिर आघाडीवर

११.२३: प्रभाग १७ ब मध्ये शिवसेनेच्या मंगला आढाव यांची पहिल्या फेरीत १३९४ मतांची आघाडी

११.२२: प्रभाग १७ मध्ये प्रशांत दिवे, मंगला आढाव (शिवसेना), आशा सातभाई दिनकर आढाव (भाजप) आघाडीवर

११.२१: प्रभाग २० मध्ये संभाजी मोरूस्कर आणि आंबदास पगारे आघाडीवर

११.२०: प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजपचे योगेश हिरे आघाडीवर

११.१९: विजयी मिरवणुका काढण्यावर बंदी; कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस आयुत्त रवींद्र सिंघल यांचे आदेश

११.१८: नाशिकमध्ये भाजपची जोरदार मुसंडी

११.१०: भाजप १६, शिवसेना ५, काँग्रेस २, राष्ट्रवादी २, मनसे एका जागेवर आघाडीवर

११.०१: प्रभाग क्र ७ मधून ड गटातून शिवसेनेचे गोकुळ आनंदराव पिंगळे आघाडीवर

१०.५८: एमआयएम एका जागेवर आघाडी

१०.५०: भाजप- ८, शिवसेना-५ काँग्रेस-२, राष्ट्रवादी आणि मनसे प्रत्येकी एका जागेवर आघाडी

१०.४४: प्रभाग २५ मधील अ गटातून सुधाकर बडगुजर, ब गटातून हर्षा बडगुजर, क गटातून भाग्यश्री ढोमसे आघाडीवर; ड गटात संतोष अरिंगळे आणि अनिल मटाले यांच्यात जबरदस्त चुरस

१०.३७: शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे, पत्नी अंजली कांदे पिछाडीवर

१०.३४: शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी २ जागांवर, तर मनसे, भाजप आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर

१०.३१: नाशिकमध्ये माजी महापौर आणि शिवसेना उमेदवार यतीन वाघ ३०० मतांनी आघाडीवर

१०.२६: नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवार आघाडीवर

१०.१८: नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला

१०.०९: थोड्याच वेळात पहिले कल हाती येणार

१०.०४: सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी होणार

९.५९: नाशिकमध्ये मतमोजणीला सुरुवात

९.५४: ‘घासून नाय, ठासून येणार’, ‘सामना’तून शिवसेनेची डरकाळी

९.४८: विद्यमान ६३ नगरसेविकांपैकी ३१ महिला नगरसेविका पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात

९.४२: महापलिका निवडणुकीच्या रिंगणात २५० पेक्षा अधिक महिला उमेदवार

९.३७: भाजप आणि शिवसेनेकडून निवडणूक प्रतिष्ठेची

९.३३: मतमोजणी केंद्रांच्या परिसरात भ्रमणध्वनी, बिनतारी संदेश यंत्रणा व तत्सम साधने, घातक शस्त्रे व ज्वलनशील पदार्थ बाळगण्यास मनाई

९.२८: मतमोजणी केंद्र आणि सभोवतालच्या २०० मीटरच्या परिसरात कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस आणि वाहनास प्रतिबंध

९.२३: सर्व ठिकाणचे पहिले निकाल दुपारी बारानंतर हाती येणार

९.१९: सकाळी दहा वाजल्यापासून शहरातील दहा वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी गुरूवारी सुरू होणार

९.१४: नाशिकमध्ये अनेक प्रभागांमध्ये चुरशीच्या लढती

९.०८: यंदा प्रभागांची पुनर्रचना झाल्याने राजकीय पक्षांपुढे आव्हान

९.०३: मनसे नाशिकचा गड राखणार का, याकडे महाराष्ट्राचे लक्ष

८.५८: प्रमुख राजकीय पक्षांसह छोट्या-मोठ्या २२ पक्षांचे व आघाड्यांचे उमेदवार रिंगणात

८.५३: चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार प्रथमच नाशिकमध्ये महापालिका निवडणूक

८.४८: २७५ बंडखोरांमुळे राजकीय पक्षांच्या चिंतेत वाढ

८.४४: नाशिकमध्ये ३१ प्रभागातील १२२ जागांवर ८२१ उमेदवार

८.४२: नाशिक महापालिकेसाठी ६१.६०% मतदान; मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार, याबद्दल उत्सुकता

८.३८: नेत्यांच्या घराणेशाहीमुळे निष्ठावंतांमधील अस्वस्थता आणि काही जागांवरील बंडखोरीमुळे राजकीय पक्षांची कसोटी

८.३५: नाशिकमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

 

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nashik municipal election results 2017 live updates mns shivsena bjp ncp congress

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×