लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : गणरायाला पर्यावरणस्नेही पध्दतीने निरोप देण्यासाठी महानगरपालिकेने ५६ ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करुन मूर्ती संकलनाची व्यवस्था केली आहे. वाकडी बारव ते पंचवटी कारंजा या मिरवणूक मार्गाची मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी पाहणी करून आढावा घेतला. रस्त्याची डागडुजी, लोंबकणाऱ्या तारा व स्वागत कमानी हटवून मिरवणूक मार्गातील अडथळे दूर झाले की नाहीत, याचे त्यांनी अवलोकन केले.

ganesh immersion procession begins with enthusiasm in nashik
Ganesh Visarjan Procession : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
JP MLA Sarita Bhadauria Fell on Railway Track video viral
वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी चढाओढ, धक्काबुक्कीत भाजपाच्या महिला आमदार पडल्या रेल्वे ट्रॅकवर;  Video व्हायरल
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Lebanon Pager Explosion
Lebanon Pager Explosion : लेबनॉन बॉम्बस्फोटानं हादरलं; आठ जणांचा मृत्यू, दोन हजारांपेक्षा अधिकजण जखमी
gulabrao patil controversial statements marathi news
गुलाबरावांची वादग्रस्त विधानांची पाटीलकी
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

गोदावरीसह तिच्या उपनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने दरवर्षीप्रमाणे विभागनिहाय ठिकठिकाणी मूर्ती व निर्माल्य संकलनाचे नियोजन केले आहे. विसर्जनासाठी शहरात २९ नैसर्गिक स्थळ तर ५६ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. पाच ठिकाणी नैसर्गिक आणि कृत्रिम अशी एकत्रित विसर्जनाची व्यवस्था राहणार आहे. नाशिकरोड विभागात फिरत्या तलावाव्दारे मूर्ती संकलनाचे नियोजन आहे. पर्यावरण संवर्धनासाठी गणेशभक्तांनी मूर्ती दान करून जलप्रदूषण टाळण्यास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा-नाशिकमध्ये मिरवणूक मार्गावर ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर – बंदोबस्तासाठी तीन हजार पोलीस

सोमवारी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी वाकडी बारव ते पंचवटीतील रामकुंड, गौरी पटांगण या मिरवणूक मार्गाची पाहणी केली. रस्त्याची डागडुजी, खड्डे बुजविणे, स्वच्छता राखणे, अतिक्रमण हटविण्याची सूचना त्यांनी आधीच केली होती. या मार्गावर लांबकळणाऱ्या वीज तारा काढण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले होते. दौऱ्यात त्यांचा आढावा घेण्यात आला. मिरवणूक सुरळीत पार पडावी, कुठल्याही त्रुटी राहू नयेत यासाठी पुन्हा पाहणी करण्यात आली. रामकुंडावर गणेश मूर्ती विसर्जनाचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

आणखी वाचा-नाशिक : संशयिताकडून चोरीच्या २७ दुचाकी जप्त

आनंदवली, आयटी पूल, नांदुर नाक्यावरही व्यवस्था

मंगळवारी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी आनंदवली परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे. चांदशी गाव ते आनंदवली नदीपात्र हा मार्ग वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. अंबड परिसरातील आयटीआय पुलाजवळ गणपती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्रिमूर्ती चौक, दत्त मंदिर चौकातील गाढवे पेट्रोल पंपासमोरून आयटीआय पुलाकडे जाणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्रिमूर्ती चौक, मोगल नगर, सिटु भवन कार्यालयासमोरून त्रिमूर्ती चौकाकडे व इतर पर्यायी मार्गाने वाहनधारकांनी जावे. याशिवाय, विसर्जनानिमित्त नांदुरनाका ते सैलानीबाबा मार्गावर व्यवस्था करण्यात आली आहे.