नाशिक – शहरात गुन्हेगारीचा आलेख चढतच असून पोलिसांचा कोणताही धाक राहिला नसल्याची स्थिती आहे. बुधवारी सकाळी पंचवटीतील म्हसरुळ परिसरात ८० वर्षांच्या महिलेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. कुसुम एकबोटे असे मृत व्यक्तीचे नाव असून हा प्रकार शेजारी झालेल्या भांडणातून झाल्याचा अंदाज आहे. सायंकाळी म्हसरूळ पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले.

म्हसरुळमधील गुलमोहर नगरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ राधानंद अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये कुसुम एकबोटे या आपल्या मुलीबरोबर तीन ते चार वर्षांपासून भाड्याने राहत होत्या. बुधवारी त्यांची मुलगी नेहमीप्रमाणे स्वयंपाक करण्यासाठी बाहेर पडली. या संधीचा फायदा घेत संशयित घरात शिरला. कुसुम यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन तो निघून गेला. हा प्रकार परिसरातील लोकांच्या लक्षात आल्यावर म्हसरूळ पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.

Plot to sell plot in Makhmalabad area foiled due to vigilance of Deputy Registrar Sharad Davange nashik
भाषेतील फरक टिपला अन् भूखंड परस्पर विक्रीचा डाव फसला; सहदुय्यम निबंधकांची दक्षता
IAS Pooja Khedkar WhatsApp Chat Pune Collector Office
Pooja Khedkar Chat : “सर्व व्यवस्था करून ठेवा…”, पूजा खेडकर यांचे ‘ते’ व्हॉट्सॲप चॅट व्हायरल
IAS Pooja Khedkar father Dilip Khedkar
Pooja Khedkar Father First Reaction : IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलीने चूक…”
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
rumor, Vishal Agarwal absconding, pimpri chinchwad police, porsche car accident
विशाल अगरवाल पोलिसांच्या ताब्यातून फरार? पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला खूलासा…
IAS Pooja Khedkar fraudulently avail attempts beyond limit
IAS Puja Khedkar : फोटो बदलला, स्वाक्षरी, ईमेल, मोबाईल आणि आई-वडीलांचं नाव बदलून दिली परीक्षा; पूजा खेडकर यांच्यावर गंभीर आरोप
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
bva chief hitendra thakur struggling to maintain his existence in assembly elections in palghar district
ठाकूरशाहीला बोईसरमध्येही हादरा?

हेही वाचा – नाशिकमध्ये तीन दिवसात हिट अँड रनच्या तीन घटना, दोन महिलांसह युवकाचा मृत्यू

हेही वाचा – विहिरीच्या वादातून वृध्दाला भावाच्या कुटूंबाने जिवंत जाळले

पोलिसांनी घटनास्थळ गाठत परिसरातील नागरिकांकडून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. कुसुम यांना आर्थिक आधार नसल्याने त्यांची मुलगी एका बंगल्यात स्वयंपाक, धुणे, स्वच्छताविषयक काम करते. म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. मागील भांडणाची कुरापत काढून ही हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.