नाशिक : आजकाल बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. नोकरी मिळणे कठीण होत आहे. सरकारी नोकरी मिळणे हे आता स्वप्नवत झाले असताना खासगी नोकरी मिळविण्यासाठीही अतोनात प्रयत्न करावे लागत आहेत. सतत बदलणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीमुळे शेती करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे नोकरीसाठी धडपड करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. स्पर्धा प्रचंड वाढली आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हे युवकांसाठी आशेच किरण ठरत आहे. या केंद्राच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगाराची संधी आणली आहे.

नाशिक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सतत बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नरत असते. वारंवार रोजगार मेळावे घेऊन युवकांना रोजगाराची संधी या केंद्राच्या वतीने करण्यात येत असते. त्यामुळेच सध्याच्या नोकरी मिळणे कठीण झाले असताना नाशिक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र युवकांसाठी एक आधार ठरत आहे. या केंद्राने नाशिक जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी पुन्हा एक संधी आणली आहे.

नाशिक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, युवाशक्ती फाउंडेशन, नाशिक आणि गुरूकुल पॉलिटेक्नीक, नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १० ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते  ते दुपारी ३ या वेळेत नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील शासकीय विश्रामगृहात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिक केंद्राचे सहायक आयुक्त वि. रा. रिसे यांनी केले आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणारअसून त्यांच्याकडून उमेदवारांच्या जागीच मुलाखती घेण्यात येणार आहेत. मेळाव्यात उपस्थित राहणाऱ्या कंपन्यांमधील रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे – युवाशक्ती स्किल इंडिया प्रा. लि. र‍िक्त पदे-२००,  महिंद्रा अँड महिंद्रा, नाशिक रिक्त पदे-२००,  जे. के. मैनी प्रेसिजन टेक्नोलॉजी लि.रिक्त पदे-१००,  एमएसएल ड्राईव्ह आईन सिस्टम‍ लि.रिक्त पदे-५०,  बजाज सन्स लिमिटेड रिक्त पदे -५०,  तापरिया टुल्स लि.रिक्त पदे-५०, एमडी इंडस्ट्रीज ॲण्ड एमडी कंपोनेन्टस. रिक्त पदे-१००,  ब्लू स्टार लिमिटेड, पालघर रिक्त पदे-२००, आयएसी इंटरनॅशनल ऑटो इं. प्रा.लि. रिक्त पदे-५०,  एस्टोमो इंडिया लि. नाशिक रिक्त पदे-१००,  गॅबरिल इंडिया लि. नाशिक रिक्त पदे-५०,  मॉस्डोरुर इंडिया प्रा.लि. नाशिक रिक्त पदे-५०,  वैष्णवी ऑओ (पी) लिमिटेड नाशिक, रिक्त पदे-२०, अशा एकूण १५ पेक्षा जास्त  आस्थापना, कंपन्या आणि  त्यांचे प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील युवक/ युवतींना एकूण १२२० पेक्षा जास्त  विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन  प्रत्यक्ष उपस्थित राहून  मुलाखती घेणार आहेत. नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in   या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त रिसे यांनी केले आहे