मशिदीवरील भोंगे काढणे नाहीतर त्याच्या समोर हनुमान चालीसा लावू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मात्र यानंतर आता नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी भोंग्यांसंदर्भात निर्देशच जारी केलेत. मशिदीपासून १०० मीटरच्या आत पाच वेळेच्या नमाजाच्या वेळी कुणालाही भोंगे लावून हनुमान चालीसा म्हणता येणार नाही. त्याने शंभर मीटर दूर अंतरावर म्हणायचं असेल त्यांना तीन मेपर्यंत परवानगी घ्यावी लागणार आहे.

सोबतच ध्वनी प्रदूषणाविषयी नियमाचे पालन करून हनुमान चालीसा किंवा नमाज पठण करावे लागणार आहे. यासाठी आवाजाची मर्यादा पाळावी लागणार आहे, असं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. भोंगे लावण्याच्या नावाखाली कोणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना थेट चार महिने तुरुंगवासाची शिक्षा याशिवाय शहरातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात येणार आहे, असं आयुक्तांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय.

A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी
Rajinder Pal Kaur
“भाजपात सहभागी होण्यासाठी ५ कोटींची ऑफर”, आप आमदाराची पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल
Sanjeev Sanyal
“UPSC म्हणजे वेळेचा अपव्यव”, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्याचं विधान; म्हणाले, “तुम्हाला खरोखरच…”

“महाराष्ट्र पोलीस अधिनियमन १९५१ च्या कलम ४० अंतर्गत हे आदेश काढण्यात आलेत. यामध्ये पोलीस आयुक्तांना असं वाटतं असेल की पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सामाजिक तेढ निर्माण होण्याची, धार्मिक भावना दुखवण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशावेळी जे कोणी पक्षकार, सामन्य जनता किंवा इतर जे घटक आहेत त्यांच्यासाठी आदेश पारित करण्याचे अधिकार पोलीस आयुक्तांना आहेत,” असं पांडेय यांनी सांगितलं आहे.

“मनसेचा विनंती अर्ज, मुस्लिम समाजाचा अर्ज, माननिय सर्वोच्च न्यायालयाने १८ जुलै २००५ रोजी दिलेला आदेश आणि महाराष्ट्र शासनाने वेगवेगळे शासन निर्णय विचार करुन, विशेष शाखेचा गोपनिय अहवाल लक्षात घेत असा आदेश पारित करण्यात आलाय आयुक्तालयाकडून की ज्या मशिदी आहेत त्याच्या १०० मीटरच्या आत तसेच आजानच्या वेळी म्हणजे पहाटे पाच, दुपारी सव्वा, सायंकाळी सव्वा पाच आणि सहाडेसहा तसेच रात्री साडेआठ वाजता अशा पाच वेळांच्या आधी किंवा नंतर १५ मिनाटांच्या कालावधीत भजन करुन, हनुमान चालीसा वाजवून किंवा दुसरे वाद्य वाजवण्यावर बंदी घालण्यात आलीय,” असं पांडेय म्हणाले.

“तीन मे पर्यंत सर्व धार्मिक स्थळं, ज्यामध्ये मंदिर, मशिदी, गुरुद्वारा तसेच अन्य धार्मिक स्थळांना भोंग्यांची परवानगी घ्यावी लागेल. ३ मे नंतर आयुक्तांच्या लेखी परवानगीशिवाय भोंगे वाजवल्यास भोंगे जप्त करण्यात येतील. तसेच त्या व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केला जाईल,” असंही पांडेय यांनी स्पष्ट केलंय.

“सर्वांनाच भोंगे लावण्याआधी काढण्याबद्दल तीन मे पर्यंतची मूभा देण्यात आलीय. सध्या आयुक्तालयाच्या क्षेत्रात कोणीही भोंगे लावण्याची परवानगी घेतलेली नाही. या आदेशाद्वारे सक्ती करण्यात आलीय. केवळ हा विषय नाही तर याच्याशी संलग्न सर्व विषयांबद्दल आदेश देण्यात आलेत. तसेच आता भोंग्यांच्या आवाजांची मर्यादा किती आहे यावरही लक्ष ठेवलं जाणार आहे. या अनुषंगाने डेसिबल लेव्हल ठरवून दिले जाणार आहेत. महापलिका क्षेत्रातासाठी आयुक्त, ग्रामीण क्षेत्रासाठी जिल्हाधिकारी आणि एमआयडीसीसाठी प्रादेशिक अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेत,” असं पोलीस आयुक्तांनी सांगितलंय.

“कुठलं धार्मिक स्थळ कुठल्या भागात येतं याचे वर्गिकरण करण्यास सांगितलं आहे. प्रत्येक धार्मिक स्थळाला एका क्षमतेपर्यंत परवानगी देण्यात येणार आहे. एकूण चार झोन आहेत औद्योगिक, व्पापारी, नागरी वस्ती आणि सायलेंट झोन. यानुसार वर्गिकरण करुन दिवसपाळी आणि रात्रपाळीचे निकष ठरवून देण्यात आलेत. या सर्वासाठी १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यात असल्याने तीन मे पर्यंत मूभा देण्यात आलीय. त्यानंतर जे काही गैरकायदेशीर भोंगे आहेत ते जप्त करण्यात आलेत. त्यापूर्वी खबरदारी म्हणून धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून अजानच्या वेळेत बंदीचा निर्णय घेण्यात आलाय,” असं पांडेय म्हणालेत.

“हनुमान चालीसा, भजन यावर बंदी घालण्यात आलेली नाही. अजानची वेळ सोडून परवानगी घेऊन मंदिरात किंवा घरात हनुमान चालीसा लावत असतील तर प्रशासनाला काहीही आपत्ती नाहीय,” असंही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलंय.