नाशिक – महापारेषणच्या टाकळी अति उच्चदाब विद्युत उपकेंद्र येथे शनिवारी देखभाल व दुरुस्तीचे काम आणि रोहित्र स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक शहर विभाग एक व दोन अंतर्गत येणाऱ्या टाकळी, मेरी, गणेशवाडी पंपिंग आणि उपनगर या विद्युत उपकेंद्र व त्यावरील विद्युत वाहिन्यांचा वीज पुरवठा शनिवारी सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत बंद राहणार आहे. ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
ज्या भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे, त्यामध्ये उत्तरा नगर वाहिनीवरील उत्तरानगर, मेट्रो मॉल परिसर, ड्रीम सिटी परिसर, अशोका मार्ग, रविशंकर मार्ग, सुयोग नगर, बोधले नगर, तपोवन रोड, गणेश बाबा नगर, आदित्य नगर, वृंदावन नगर. टाकळी वाहिनीवरील टाकळी गाव, अनुसयानगर, तपोवनरोड, मारुती वेफर्स परिसर आणि जय शंकर लॉन परिसर याशिवाय शंकर नगर वाहिनीवरील शंकरनगर, काठे गल्ली, माणेकशानगर, बुऱ्हानी सोसायटी, त्रिकोणी गार्डन, टाकळी रोड आणि परिसराचा समावेश आहे.
गोदावरी वाहिनीवरील गोदावरी परिसर, सारडा सर्कल, जुने नाशिक, ट्रॅक्टर हाऊस, नानावली, कठडा, टिकापुरी, गाडगेबाबा मठ, बुधवार पेठ, पाटील गल्ली, भंगार वाडी, काजीपुरा, मुलतानपुरा , कोकणीपुरा, भेळगल्ली, स्टार लाइन, वॉटर ग्रेस, अमरधाम, काजी बिल्डिंग, मोदकेश्वर, मानवता हॉस्पिटल, कोर्टयार्ड व परिसरात दुपारी तीन तास वीज पुरवठा बंद राहणार आहे.
या व्यतिरिक्त सारडा सर्कल, झाकीर हुसेन हॉस्पिटल, शिवनेरी झोपडपट्टी, डॉ. आंबेडकर गार्डन, द्वारका सर्कल, महात्मा फुले पुतळा, बागवानपुरा, बुरुड गल्ली, आझाद चौक, राजवाडा, चौक मंडई, कावेरी हॉटेल, महालक्ष्मी चाळ, गोदावरी हॉटेल, निरंजन गॅरेज, नागसेन वाडी, आझादनगर, वाणी हाऊस व परिसर या भागाचा समावेश असणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या पाणी पुरवठा प्रणालीत देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे मध्यंतरी शहरात वा काही भागात पाणी पुरवठा बंद ठेवला गेला. आता विद्युत देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे वीज पुरवठा बंद ठेवला राहणार आहे. प्रचंड उकाडा जाणवत असताना भर दुपारी काही तासांसाठी वीज पुरवठा बंद राहणे, नागरिकांसाठी असह्य ठरण्याची चिन्हे आहेत.
महावितरणचे आवाहन
देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तत्काळ सुरू करण्यात येईल. संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या शहर विभाग दोनकडून करण्यात आले आहे.
