मुद्रणालयात चोरी झालीच नाही

सीआयएसएफची सुरक्षा यंत्रणा कडक असल्याने बंडल बाहेर जाणे शक्य नव्हते.

पाच लाख रुपयांचे बंडल चुकू न पंचिंग; दोन पर्यवेक्षक निलंबित 


नाशिक : नाशिकरोड येथील प्रतिभूती मुद्रणालयाच्या वतीने  सरकारी चलनी नोटांच्या कारखान्यातून सहा महिन्यापूर्वी पाच लाखांच्या नोटांचे बंडल चोरीस गेले होते. त्यामुळे खळबळ  उडाली होती. या प्रकरणाचा तपास उपनगर पोलिसांनी कौशल्याने के ला. कामाच्या व्यापात पाच लाखांचे बंडल कटपॅक विभागातील दोन पर्यवेक्षकांकडून पंचिग झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांनी प्रेस व्यवस्थापनाला लेखी कबुलीजबाब दिला आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे  उपनगर पोलिसांकडून सांगण्यात आले.

सहा महिन्यापूर्वी म्हणजेच फेब्रुवारीत मुद्रणालयात ज्या ठिकाणी नोटांची छपाई होते त्या भागातून पाच लाखांच्या पाचशेच्या नोटांचे बंडल चोरीस गेल्याची तक्रार १३ जुलैला उपनगर पोलीस ठाण्यात मुद्रणालय व्यवस्थापनाने दाखल केली होती. मुद्रणालयाच्या वतीने  सहा महिने अंतर्गत तपास केल्यानंतरही माग लागला नव्हता. पोलिसांनी तपासा दरम्यान संबंधित विभागातील अधिकारी आणि कामगारांकडे चौकशी सुरु करूनही प्रारंभी काहीच माहिती हाती लागत नव्हती.पोलिसांनी नोटा छपाईची सर्व प्रक्रिया माहीत करून घेतली. हे बंडल शेवटी कोणाच्या निदर्शनास आले याची माहिती घेतली. मुद्रणालयातील कटपॅक विभाग आणि बांधणी विभागातील नोंदी तपासल्या. त्यावरून चोरीस गेलेले बंडल १२ फेब्रुवारीला तपासणीसाकडून तपासले गेल्याचे दिसले. त्याबाबत निश्चिातता होत नसल्याने बंडलचे संपूर्ण पार्सल फोडून तपासणी केली असता त्या ठिकाणी दुसरेच बंडल तपासणी केल्याचे दिसून आले.

या ठिकाणी सीआयएसएफची सुरक्षा यंत्रणा कडक असल्याने बंडल बाहेर जाणे शक्य नव्हते. सर्व कामगारांची जातांना आणि येतांना संपूर्ण अंगझडती घेतली जात असल्याने बंडल बाहेर जाऊ शकत नसल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी कामगारांना विश्वाासात घेतले. तरीही ठोस माहिती मिळत नव्हती. पोलिसांनी पर्यवेक्षकाकडील नोंदणी तपासल्या. त्यात कटपॅक विभागाच्या दोन पर्यवेक्षकांवर तपास केंद्रित झाला. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी खरी माहिती देण्यासाठी वेळ मागितला. पोलीस कारवाईच्या भीतीने २४ जुलैला त्यांनी स्वत:हून व्यवस्थापनाला कबुलीजबाब दिला. त्यांनी हे नोटांचे बंडल चोरीस गेलेले नसून कामाच्या ताणात पंचिंग झाले आणि व्यवस्थापन कारवाई करेल या भीतीने ही गोष्ट कोणास सांगितली नसल्याचे त्यांनी लेखी दिले. या कबुली जबाबाची खात्री करण्यात आली. पोलिसांनी कटपॅक विभागातील सर्व नोंदण्यांची बारकाईने तपासणी केली. त्यामुळे धागे सापडत गेले. वरिष्ठ व्यवस्थापकांना याची माहिती होती काय, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nashik road printing press sieve notes factories bundle of notes stolen akp