नाशिक: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि भुजबळ नॉलेज सिटी (एमईटी), आडगाव यांच्या सहकार्याने शुक्रवारी सकाळी दहा वाजता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात नाशिकसह राज्यातील विविध विभागांतून तसेच गुजरात मधील विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जिल्हा कौशल्य विकासच्या वतीने जिल्हा परिसरातील बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात येतो. वर्षभरात साधारणतः दहाहून अधिक मेळावे घेण्यात आले.
यंदा रोजगार मेळाव्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा, नाशिक (रिक्त पदे- २००), बॉश लिमिटेड, नाशिक (१५०), स्पार्क एच. आर. सोल्युशन (४४), टीएसपीएल ग्रुप, चाकण, पीएमईए सोलर टेक प्रा. लि. (२५), गॅब्रिएल इंडिया लिमिटेड, नाशिक (रिक्त पदे- ३०), झेडटीकेआयएन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक (रिक्त पदे- २००), कॉसमॉस मॅनपावर प्रा. लि., गांधीनगर, गुजरात (रिक्त पदे- ३००), जेबीएम ऑटो, सातपूर, नाशिक (रिक्त पदे- ६०), सुदाल इंडस्ट्रीज लि., नाशिक (रिक्त पदे- ०६), इक्विटास स्मॉल फायनान्स, नाशिक (रिक्त पदे- ०५), एन्ट्रेगो बीकेएस बसडक्ट प्रा. लि., नाशिक (रिक्त पदे- ०४), गोविंद एच. आर., नाशिक (रिक्त पदे- ५०), अशी एकूण १२२४ रिक्त पदांसह वरील नामांकित कंपन्या/नियोक्ते व त्यांचे प्रतिनिधी शुक्रवारी भुजबळ नॉलेज सिटी (एमईटी), आडगाव, नाशिक या ठिकाणी उपस्थित राहून प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास http://www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगिन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अप्लाय करावे. ५ वी उत्तीर्ण पासून दहावी, १२ वी, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, ग्रॅज्युएट व पोस्ट ग्रॅज्युएट पदवीधारकांनी उक्त नमूद ठिकाणी उपस्थित राहून प्रत्यक्ष मुलाखती देऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. भरती इच्छुक नियोक्त्यांनी जास्तीत जास्त रिक्त पदे http://www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ‘Pandit Dindayal Upadhayay Job Fair’ या पर्यायावर क्लिक करून पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा यावर रिक्त पदे अधिसूचित करावीत व शुक्रवारी उपस्थित राहावे.
याबाबत काही अडचणी आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या ०२५३-२९९३३२१ या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांनी केले आहे.
