नाशिक राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने सध्या इयत्ता १२ वीची परीक्षा सुरू असून इयत्ता १० वीची परीक्षाही लवकरच सुरू होणार आहे. परीक्षा काळात विद्यार्थी, शिक्षक हे मानसिक ताणापासून दूर राहावेत, यासाठी मदतवाहिनी सुरू करण्यात आली असली तरी ही सुविधा जास्तीजास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मंडळाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. परीक्षा केंद्रावर तक्रार पेटी असावी, अशी मागणी होत आहे. दुसरीकडे, समुपदेशकांकडे परीक्षेची भीती वाटत असून अभ्यासक्रम, परीक्षा पध्दती याविषयी विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा >>>“…हा हलकटपणा आहे”, शिंदे गटाच्या ‘त्या’ कृत्यावर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
UPSC Result, UPSC Result Marathi News, UPSC Civil Services Final Result 2023 Out
यूपीएससी परीक्षेत विदर्भाचा डंका, नागपूरच्या पाच विद्यार्थ्यांनी मारली बाजी
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?

विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेविषयी असलेली भीती घालविण्यासाठी राज्य शिक्षम मंडळाकडून मदतवाहिनी सुरू करण्यात आली आहे. अभ्यास, परीक्षा याविषयी विद्यार्थी या मदतवाहिनीवर शंका विचारू शकतात. शिक्षकांनाही या सेवेचा लाभ घेता येतो. ही मदतवाहिनी सुरू होऊन आठपेक्षा अधिक दिवस झाले असले तरी केवळ १२ विद्यार्थ्यांनी आपल्या शंका विचारल्या आहेत. काही शिक्षकांनी तसेच परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्यांनी परीक्षा सुरू असतांना पथकांकडून, संबंधित अधिकाऱ्यांकडून सातत्याने होणाऱ्या भेटीविषयी नाराजी व्यक्त केली. बहुतांश विद्यार्थ्यांकडून परीक्षेविषयी भीती वाटत असल्याचे सांगितले गेले. मागील वर्षाच्या तुलनेत अभ्यासक्रम पूर्ण झाला. तो वेळेत पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयांकडून प्रयत्नही झाले. पण अभ्यासक्रम, परीक्षा पध्दती, परीक्षेचे नियोजन याविषयी चर्चा झालेली नाही. यामुळेच उत्तरपत्रिका सोडवितांना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.

याविषयी शिक्षण मंडळाचे समुपदेशक अरूण जायभावे यांनी भूमिका मांडली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटते. ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला ते मजेत परीक्षा देत आहेत. मात्र ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी झाला, त्यांना परीक्षेला वेळ पुरेल का, वेगळे काही प्रश्न आले तर, एखाद्या विषयाचा अभ्यास थोडक्यात कसा करायचा, उत्तीर्ण होण्यापुरता का होईना गुण कसे मिळतील, असे प्रश्न पडत आहेत. मुलांची अवांतर वाचन, लेखन करायची सवय राहिलेली नाही, करोना काळात विद्यार्थी भ्रमणध्वनी वेडे झाले. याचा परिणाम उत्तरपत्रिका सोडवितांना जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>नाशिक : भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोरी पुन्हा उघड; लाच स्वीकारताना लिपिक जाळ्यात

मदतवाहिनीविषयी विद्यार्थी अनभिज्ञ

राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मदतवाहिनीची माहिती प्रसिध्दी माध्यमातून देण्यात आली आहे. वर्तमानपत्र सर्वांकडे येते असे नाही. यामुळे परीक्षा केंद्रावर असलेल्या फलकांवर मदतवाहिनी क्रमांक, समुपदेशकांची नावे, क्रमांक देण्यात यावेत तसेच परीक्षा काळात काही विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे प्रत्येक परीक्षा केंद्रावर तक्रार पेटी ठेवण्यात यावी, पूर्णवेळ समुपदेशक नेमण्यात यावा, आदी मागण्या होत आहेत.