नाशिक – जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

कळवण तालुक्यातील कोसवण येथील दीपक बर्डे (२१) हा युवक भोरू भरसट यांच्या शेतातील विहिरीत पडला. परिसरातील नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच बर्डे यांना प्राथमिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी अभोणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा – नाशिक : बनावट नोटांसह दोन महिला ताब्यात

हेही वाचा – अब्दुल मालिक यांच्यावरील गोळीबारामागे राजकीय षडयंत्र – इम्तियाज जलील यांचा आरोप

दुसरी घटना नांदगाव तालुक्यात घडली. नांदगाव येथील विकी गोटे (सात) हा शाकंबरी नदीपात्रात खेळत असताना तो पाण्यात बुडाला. परिसरातील नागरिकांनी त्याला नांदगाव येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.