नाशिकमध्ये भररस्त्यात तरुणाची हत्या

एका टोळक्याने तीक्ष्ण हत्याराने वार करत तरुणाची हत्या केली असून या प्रकरणी भद्रकाली पोलीस अधिक तपास करत आहेत. 

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

नाशिकमध्ये गुरुवारी रात्री भररस्त्यात एका तरुणाची हत्या केल्याची घटना घडली. एका टोळक्याने तीक्ष्ण हत्याराने वार करत तरुणाची हत्या केली असून या प्रकरणी भद्रकाली पोलीस अधिक तपास करत आहेत.

भद्रकाली परिसरात राहणाऱ्या मनिष रेवर या तरुणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. मनिषवर गुरुवारी रात्री एका टोळक्याने हल्ला केला. त्यांनी मनिषवर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. भररस्त्यात घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nashik youth murdered in bhadrakali probe begin