Navratri Festival Start at Saptashring Fort in nashik | Loksatta

सप्तश्रृंग गडावर नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ

दुपारपर्यंत जवळपास ६० हजार भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. तर सुमारे १० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

सप्तश्रृंग गडावर नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ
सप्तश्रृंग गडावर नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंग गडावरील श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या नवरात्रोत्सवास उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. पहाटेपासून विविध धार्मिक पूजा-अर्चा यासह महावस्त्र, अलंकाराची विश्वस्तांच्या मुख्य कार्यालयात अलंकारांचे पूजन अध्यक्ष वर्धन पी. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

हेही वाचा- सप्तश्रृंग गडावरील बोकडबळी प्रथेसंबधी जनहित याचिका; सोमवारी सुनावणी

जिल्हा न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांच्या हस्ते घटस्थापनेची महापूजा

यात्रा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संघटनांनीही हातभार लावलेला आहे. घटस्थापनेची मुख्य महापूजा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. यावेळी विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश देसाई, पालकमंत्री दादा भुसे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय, विश्वस्त बंडू कापसे, ॲड. ललित निकम, मनज्योत पाटील, प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, राजशिष्टाचार अधिकारी नितिन आरोटे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा- मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई; पोलिसांचा इशारा

६० हजार भाविकांनी घेतले दर्शन

दुपारपर्यंत ६० हजार भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. सुमारे १० हजार भाविकांनी प्रसादालयात मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रा उत्सव दरम्यान दोन वेळचे मोफत अन्नदान (महाप्रसाद) सुविधा सुरु असून येणाऱ्या भाविक भक्तांच्या सेवा-सुविधेसाठी २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. सप्तशृंगगड परिसरात भाविकांची कुठल्याही पद्धतीने गैरसोय होऊ नये, त्या दृष्टीने कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून २५६ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. एकूण १७० सुरक्षारक्षक, आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेतील स्वयंसेवक कार्यरथ आहेत

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई; पोलिसांचा इशारा

संबंधित बातम्या

VIDEO: “अनेक मुलींचे खून हिंदू मुलांकडूनही झालेत आणि…”, ‘लव्ह जिहाद’वर बोलताना संजय राऊतांचं मोठं विधान
Ajit Pawar anger on Journalist: अजित पवार यांना जेव्हा राग येतो..
नाशिकमध्ये करोना परिस्थिती हाताबाहेर
अडीच हजार वर्षांपूर्वी सगळे बौद्ध होते; रामदास आठवलेंचं वक्तव्य
नाशिकमध्ये इडली विक्रेत्याकडून पाच लाखाच्या बनावट नोटा जप्त

व्हिडिओ

ताज्या बातम्या
शेतकऱ्यांच्या मुलांना ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार; खरेदीसाठी सबसिडीही मिळणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार
“आता लवकरच…” लग्नानंतरची पाठकबाईंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
सॅलेडमध्ये मीठ टाकण्याची सवय आहे का? यामुळे होऊ शकते आरोग्याचे नुकसान, लगेच जाणून घ्या
‘बाळासाहेबांची शिवसेने’चे उद्या पुण्यात शक्तीप्रदर्शन; खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
ऐकावं ते नवलचं! १ कोटीचं पॅकेज तरिही ऑफिसमध्ये नाही काम, कर्मचाऱ्याने चक्क बॉसविरोधात कोर्टात दिली तक्रार