scorecardresearch

‘जनता हिशोब चुकता करेल’; वेदान्ता प्रकल्पावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

वेदान्ता प्रकल्प गुजरातला गेल्याच्या विरोधात नाशिमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी घेषणांनी परिसर दणाणून गेला होता.

‘जनता हिशोब चुकता करेल’; वेदान्ता प्रकल्पावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक
वेदान्ता प्रकल्पावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प गुंतवणूक राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये गेल्याने २ लाख लोकांचा रोजगार गेला आहे. यामुळे जनतेमध्ये नाराजी झाल्याने जनता निवडणुकीत यांचा हिशोब चुकता करणार आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रात नविन प्रकल्प आणावा अन्यथा राज्य सरकारला स्वस्थ बसू देणार नाही अशा इशारा यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिला.

हेही वाचा- शिंदे गटाचा शिवसेनेला पुन्हा धक्का; प्रवीण तिदमे यांची नाशिकच्या महानगरप्रमुखपदी नियुक्ती

घोषणांनी परिसर दणाणला

वेदान्ता- फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. उपायुक्त रमेश काळे यांना निवेदन देण्यात आले. “गुजरातला उद्योगाचा पेटारा, महाराष्ट्राला बेरोजगारीचा कटोरा”, “शिंदे खातात महाराष्ट्राची भाकरी, करतात मोदी-शहाची चाकरी”, “गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी” अशा घोषणांनी परिसर दणाणला होता.

हेही वाचा- “ठाकरे सेनेचा दसरा मेळावा शरद पवार आणि सोनिया गांधींच्या विचारांचा…” गुलाबराव पाटलांची टीका

वेदान्ता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील रोजगार हिरावला

यावेळी बोलतांना शेख म्हणाले, वेदान्ता-फॉक्सकॉन ग्रुपचा सुमारे दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असणारा प्रकल्प गुजरातला हलविण्यात आला. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे १.५४ लाख हक्काचे रोजगार हिरावले गेले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक प्रकल्प राज्यात येणार होते. वेदान्ता कंपनीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशमध्ये पाहणी केली होती. त्यानंतर सर्व अटींचा विचार करून महाराष्ट्र अंतिम केले. वेदान्ताच्या वरिष्ठ पथकाने सुद्धा तळेगाव दाभाडे हीच योग्य जागा सांगितली होती. मात्र, हा प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आला.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.