पाथर्डी फाटा परिसरातील अनमोल नयनतारा गोल्ड इमारतीत नवदाम्पत्याने घरातील छताच्या हुकास दोरी बांधून गळफास घेतला. आर्थिक विवंचनेतून दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.गौरव जगताप (२९) आणि नेहा जगताप ( २३) असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. अनमोल नयनतारा गोल्ड इमारतीतील सदनिका क्रमांक १२ मध्ये जगताप दाम्पत्य वास्तव्यास होते. नातेवाईक महिला भ्रमणध्वनीवरून नेहाशी संपर्क साधत होती. परंतु, उत्तर मिळत नसल्याने त्यांनी गौरवचा भाऊ यश जगताप आणि काका अरूण गवळी यांना त्यांच्या घरी पाठविले. घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे त्यांनी सोसायटीतील रहिवाशांच्या मदतीने दरवाजा तोडला असता जगताप दाम्पत्याने गळफास घेतल्याचे दिसले. या संदर्भात इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>जळगाव: विद्यार्थ्यांची डोळे तपासणी अनिवार्य करा; डॉ. धर्मेंद्र पाटील यांची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Brutal killing of daughter along with wife in Buldhana
खळबळजनक ! पत्नीसह कन्येची निर्घृण हत्या; मारेकऱ्याने स्वत:ही घेतली विहिरीत उडी…
chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
policeman committed suicide by shooting himself in the head
नागपूर : डोक्यात गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाचा ताण की…
Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!

दाम्पत्याच्या आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी घरात छाननी केली. परंतु, कुठलीही चिठ्ठी आढळली नाही. आसपासच्या रहिवाशांकडून यंत्रणेने माहिती घेतली. त्यानुसार जगताप दाम्पत्य आर्थिक विवंचनेत होते, अशी माहिती मिळाली. गौरव आणि नेहा यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. खासगी कंपनीत नोकरीस असणाऱ्या गौरव जगताप यांनी पाथर्डी फाटा परिसरातील इमारतीत कर्ज घेऊन सदनिका घेतली होती. मात्र नंतर त्यांची नौकरी गेली. घरासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड आणि अन्य खर्चाची जुळवाजुळव करणे अवघड झाले. कर्जाचा डोंगर वाढत गेला. या विवंचनेतून हे टोकाचे पाऊल उचलले गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत तपास सुरू असल्याची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय बांबले यांनी दिली.