Premium

नाशिक: अनधिकृत बांधकामाविरोधातील तक्रारीमुळे उलटा ससेमिरा

पोलीस कर्मचाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनीही मनपातील तक्रार मागे घेण्याचा अजब सल्ला दिल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

complaint against illegal construction in nashik
अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रार (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता टीम

रविशंकर रस्त्यावरील मनपाच्या जागेतील अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार करणे तक्रारकर्त्याला चांगलेच महागात पडले आहे. मनपाने आपले नाव गोपनीय न ठेवता सार्वजनिक केले. गोपनियतेचा भंग करून आपल्या जिवितास धोका उत्पन्न करणारे मनपाचे अधिकारी आणि स्थानिक रहिवाश्यांना चिथावणी देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराने पोलीस आयुक्तांकडे केली आहे. आपला अवैध बांधकामाला विरोध असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे रविशंकर रस्त्यावरील मनपाच्या भूखंडावर काही स्थानिकांनी अवैध बांधकाम केले आहे. त्याबाबतची तक्रार स्वप्नील गायकवाड यांनी मनपाकडे केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नाशिक: मुलीच्या अपहरणामुळे बदनामीच्या भीतीने आई-वडिलांची आत्महत्या

ही तक्रार केल्यानंतर मनपाने आपले नाव गोपनीय न राखल्याने स्थानिकांनी तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचे गायकवाड यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या संदर्भात काहींनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आपणास संबंधित बांधकामाकडे न जाण्यास सांगितले. त्यानुसार आपणही तिकडे जाणे बंद केले. दोन स्थानिक व्यक्तींच्या चिथावणीमुळे ४० ते ५० महिलांचा जमाव आपल्या घरी जमा झाला. त्यांच्यासमवेत आपण बांधकाम परिसरात गेलो असता सर्वांनी तक्रार मागे घेण्याकरिता दबाव टाकला, असे तक्रारदार गायकवाड यांचे म्हणणे आहे. या बांधकामाशी संबंधित काहींनी मध्यंतरी ते बंद ठेवले.

हेही वाचा >>> नाशिक: जीर्ण १११२ वाडे, इमारतींना नोटीसचा सोपस्कार – मनपाचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित

बाहेर आपल्या नावाचा फलक लावला. त्यावर आपले नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक दिल्याचे समजते. हा फलक समाज माध्यमावर प्रसारित केला गेला. त्यामुळे अनेकांकडून भ्रमणध्वनीद्वारे ट्रोल केले जात आहे. या काळात घरी येऊन गेलेल्या उपनगर पोलीस कर्मचाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनीही मनपातील तक्रार मागे घेण्याचा अजब सल्ला दिल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. आपल्या जिवास धोका उत्पन्न करणाऱ्या मनपातील अधिकाऱ्यांचा तपास करून त्यांच्यावर आणि तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकणाऱ्या रहिवाश्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 12:21 IST
Next Story
नाशिक: मुलीच्या अपहरणामुळे बदनामीच्या भीतीने आई-वडिलांची आत्महत्या