scorecardresearch

Premium

नाशिक : धनगर समाजाला आदिवासी आरक्षणाचा लाभ देण्यास विरोध, बोरगावात रास्ता रोको

धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणाचा लाभ देऊ नये, यासाठी आदिवासी टायगर ग्रुप, अखिल भारतीय विकास परिषद आणि आसरा फाउंडेशनतर्फे सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात रास्ता रोको करण्यात आला.

tribal reservation Dhangar community
नाशिक : धनगर समाजाला आदिवासी आरक्षणाचा लाभ देण्यास विरोध, बोरगावात रास्ता रोको (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नाशिक – धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणाचा लाभ देऊ नये, यासाठी आदिवासी टायगर ग्रुप, अखिल भारतीय विकास परिषद आणि आसरा फाउंडेशनतर्फे सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात रविवारी सकाळी ११ वाजता एक तास रास्ता रोको करण्यात आला.

सुरगाणा तहसीलदार प्रशांत कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास आदिवासी आसरा फाउंडेशनतर्फे पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आदिवासी समाजाला संविधानाने साडेसात टक्के आरक्षण दिले आहे. त्या आरक्षणाचा लाभ घेऊन आदिवासी समाजाला विविध योजना व शासकीय नोकरीचा लाभ मिळत आहे. धनगर समाजाला आदिवासी आरक्षण मिळेपर्यंत आदिवासी योजनांचा लाभ देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ सप्टेंबरला केली. याचा विरोध म्हणून आदिवासी संघटनांनी आंदोलन केले.

women empowerment (1)
महिला सशक्तीकरणासाठी राज्य सरकारचे नवे अभियान; राज्यातील एक कोटी महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न
cm Eknath Shinde in cleanliness campaign in mumbai
स्वच्छतेचा जागर! राज्यात ७२ हजारांपेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छता मोहीम
Shabari Gharkul Yojna, nashik agitation for shabari gharkul yojana, igatpuri agitation for shabari gharkul yojana
शबरी योजनेंतर्गत घरकुलासाठी आंदोलन; नाशिकसह इगतपुरीत ठिय्या आंदोलन
dhangar community protest
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा; तुळजापुरात विराट मोर्चा व रास्ता रोको

हेही वाचा – नाशिकमध्ये प्रगतिशील साहित्य संमेलनाची तयारी

हेही वाचा – जळगाव: साने गुरुजींच्या कर्मभूमीत गोडसे, भिडे यांच्या प्रतिमांसह नृत्य; अमळनेरात विसर्जन मिरवणुकीतील प्रकार उघड

आंदोलनात मोहन गांगुर्डे, सखाराम भोये, अशोक गवळी, भास्कर भोये, संदीप भोये, मुरलीधर ठाकरे, चंद्रकांत भरसट, सचिन राऊत आदी सहभागी होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Opposition to giving benefit of tribal reservation to dhangar community road stop at borgaon ssb

First published on: 01-10-2023 at 17:04 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×