वाढीव तिकीट दराचा भार वाढला; इंजिनजवळ दर्शनी भागातच भुसावळ-मनमाड -इगतपुरी मेमू रेल असा फलक

मनमाड : उत्तर महाराष्ट्रांतील हजारो रेल्वे प्रवाशांना दोन वर्षांपासून प्रतिक्षा असलेली इगतपुरी – भुसावळ मेमू एक्स्प्रेसचे सोमवारी दुपारी मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात आगमन झाल्यावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. ही गाडी सुरू झाल्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. उद्घाटनानिमित्त मेमू  रेल्वेला आकर्षक सजावट करण्यात आली होती. इंजिनजवळ दर्शनी भागातच भुसावळ-मनमाड -इगतपुरी मेमू रेल असा फलक लावण्यात आला. पहिल्या दिवशी मनमाड रेल्वे स्थानकांतून या गाडीने २५ प्रवाशांनी प्रवास केला. १४३५ रुपये इतका महसूल रेल्वेला मिळाला. दुपारी ११ वाजून ५२ मिनिटांनी फलाट क्रमांक चारवर भुसावळ-इगतपुरी मेमू रेल्वेचे आगमन झाले. आणि प्रवाशांचा उत्साह द्विगुणित झाला. रेल्वे अधिकाऱ्यांसह प्रवासी  आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत मेमूचे रेल्वे स्थानकांत स्वागत केले. महिला पदाधिकाऱ्यांनी या गाडीचे लोको पायलट, गार्ड आदींचे औक्षण केले. तर इंजिनच्या समोर नारळ वाढवून घोषणा देण्यात आल्या. गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे अनेक रेल्वेगाडय़ा अद्यापही बंद आहेत.

pune marathi news, pune daund local train marathi news
पुणे-दौंड रेल्वे प्रवाशांची अडथळ्यांची शर्यत! रेल्वे प्रशासनाकडून निर्णय होईना
Jamtara Train accident
झारखंडच्या जामतारा स्थानकाजवळ मोठी दुर्घटना, रेल्वेची १२ प्रवाशांना धडक, दोन जणांचा मृत्यू
Single airline monopoly Nagpur
नागपूर-मुंबईदरम्यान एकाच विमान कंपनीची मक्तेदारी; प्रवासी त्रस्त, कंपनी…
Ajni Chowk
नागपूर : पाच रस्ते, मेट्रोस्थानकामुळे अजनी चौक ‘अपघातप्रवण’! नीरीच्या नियोजित जागेवर मेट्रो स्थानक न बांधल्याचा फटका

उत्तर महाराष्ट्रांतून प्रवास करणारे हजारो चाकरमानी आणि प्रवाशांची त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने भुसावळ-इगतपुरी मेमू  रेल्वे सुरू केल्याने या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला  आहे. ही गाडी पूर्णत: अनारक्षित असून मनमाड स्थानकांत येण्यापूर्वी एक तास अगोदर अनारक्षित तिकीटे प्रवाशांना दिली जातील. मनमाड ते नाशिक रोड ६० रुपये तिकीट आहे. मनमाड ते भुसावळ ७५ रुपये तिकीट लागेल. ११ वाजून ५२ मिनिटांनी या मेमू गाडीने अनेक प्रवासी मनमाड  स्थानकांत उतरले. मनमाडमधून  नाशिकला जाण्यासाठी २५ प्रवासी बसले. स्वागत समारंभाचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर १२ वाजून १५ मिनिटांनी मेमू नाशिककडे रवाना झाली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी या गाडीसाठी पाठपुरावा केल्याने भाजपने उत्साहात या गाडीचे स्वागत केले.

वैशिष्टय़े काय ?

नव्याने सुरू झालेल्या या मेमू गाडीचे पहिल्याच दिवशी प्रवाशांना मोठे आकर्षण होते. या गाडीला आठ डबे आहेत. पूर्णत: लोकल स्वरूपात ही रेल्वे आहे. समोरासमोर आसने, एका आसनावर तीन प्रवासी बसू शकतील अशी सुविधा, आरामदायी खुच्र्या, हवा खेळती राहण्यासाठी मोठी खिडकी, डबे परस्परांना सलग जोडलेले, त्यामुळे एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज जाता येते. प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी व्यवस्था आहे.

भुसावळ- मनमाड -इगतपुरी शटलचे तिकीट याआधी मनमाड ते नाशिकसाठी २० रुपये होते. मेमूचे तिकीट ६० रुपये आहे. एक्स्प्रेसचा दर्जा आणि थांबा मात्र प्रत्येक स्थानकासाठी आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेची पिळवणूक आहे. करोना काळात प्रवाशांना भुर्दंड का ?

– सुशांत राजगिरे (मनमाड)