वीजदेयकापोटी ५१ लाखांचा भरणा

‘महावितरण’च्या ओझर उपविभागातर्फे चांदोरी- चितेगाव फाटा येथे महाकृषी अभियानांतर्गत शेतकरी  ग्राहक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

निफाड तालुक्यातील चांदोरी येथील ग्राहक संवाद मेळाव्यात कृषी वीज देयक भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करताना महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर आणि इतर

नवीन कृषी वीज जोडणी आणि थकबाकी मुक्तीचा लाभ घेण्याचे आवाहन; २७९ शेतकऱ्यांचा समावेश

नाशिक : ‘महावितरण’च्या ओझर उपविभागातर्फे चांदोरी- चितेगाव फाटा येथे महाकृषी अभियानांतर्गत शेतकरी  ग्राहक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात २७९ शेतकऱ्यांनी वीज देयकापोटी ५१ लाखांचा भरणा केला. नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी या शेतकऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

राज्यात कृषी वर्गवारीची थकबाकी ४५ हजार कोटी रुपये आहे. या योजनेच्या माध्यमातून व्याज व दंड माफ करून शेतकऱ्यांनी जमा केलेली रक्कम त्यांच्या गावांमध्ये आणि जिल्ह्यांमधील पायाभूत योजनांसाठी खर्च केली जाणार आहे. ‘महावितरण’चा उद्देश नफा कमविणे नसून ग्राहक सेवा हेच ब्रीद असल्याचे सांगत जनमित्र व अभियंत्यांनी सुसंवाद साधत ग्राहकांच्या संपर्कात राहावे आणि शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन समस्या तात्काळ सोडवाव्यात, असे आदेश कुमठेकर यांनी नवीन कृषी वीज जोडणी आणि थकबाकी मुक्तीचा सर्वानी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

शेतकऱ्यांनी चालू वीज देयक आणि सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा मार्च २०२२ पर्यंत केल्यास  सुमारे ६६ टक्के सवलत देण्यात येत आहे. ‘महावितरण’ आर्थिक संकटात असून चालू वीज देयक भरून सहकार्य  करण्याचे आवाहन अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी केले. ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे यांनी कृषी धोरण योजनेसंदर्भात विस्तृत माहिती दिली. देयक भरल्यानंतर आम्हांला विद्युत यंत्रणेचे सक्षमीकरण व गतिमान सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मेळाव्यात विविध सूचना, तक्रारी आणि अपेक्षा मांडल्या गेल्या. यावेळी उपकार्यकारी अभियंता किरण जाधव, ओझर उपविभागातील अभियंते, जनमित्र, विविध गावचे सरपंच आणि शेतकरी उपस्थित होते.

ओझर विभागात मोठी थकबाकी

ग्रामीण विभागांतर्गत ओझर उपविभागाची एकूण कृषी वीज देयक थकबाकी १६० कोटी असून कृषी धोरण अंतर्गत सुधारित थकबाकी ६६.४७ कोटी रुपये आहे.  नोव्हेंबपर्यंत एकूण नऊ कोटी ४९ लाख  रुपयांचा कृषी वीज देयकाचा भरणा शेतकऱ्यांनी केलेला आहे. या मेळाव्यात २७९ शेतकऱ्यांनी ५१ लाख १३ हजार रुपये  इतका भरणा केला. तसेच घरगुती आणि इतर वर्गवारीतील ग्राहकांनी तीन लाख रुपयांचा भरणा केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Payment electricity bill ysh

Next Story
राज ठाकरेही साधू-महंतांच्या दर्शनार्थ नाशिकमध्ये
ताज्या बातम्या