करोना संसर्ग वाढल्याने गेल्या वर्षी पुणे जिल्ह्य़ातील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांची पाठ

नाशिक : वर्षभराहून अधिक काळापासून पर्यटन व्यवसायाला ग्रहण लागले आहे. उत्तराखंडमधील पाऊस, कोकणसह देशात अन्य ठिकाणी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे पर्यटन व्यवसाय विस्कळीत झाला. पावसाळ्यात मुंबई, पुण्याचे पर्यटक लोणावळा, खंडाळा यासारख्या ठिकाणांना भेटी देतात. परंतु, मागील वर्षी करोना संसर्गाच्या भीतीने त्यांनी लोणावळा, खंडाळ्याव्यतिरिक्त पर्याय म्हणून इगतपुरी, त्र्यंबके श्वर तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणांची निवड के ली होती. यंदाही पावसाळ्यात ही मंडळी पुन्हा एकदा इगतपुरी, त्र्यंबके श्वरला पसंती देण्याची शक्यता असल्याने या दोन्ही तालुक्यातील पर्यटन वाढावे, यासाठी प्रशासनाने नियोजन करण्याची मागणी पर्यटक व्यावसायिकांकडून के ली जात आहे.

दैनंदिन कामकाजातून थोडा फार विरंगुळा मिळावा, यासाठी पर्यटनाकडे कल वाढला आहे. एक दिवसापासून १५ दिवस, कधी महिनाभर आपल्या आर्थिक क्षमतेनुसार पर्यटनाचा कालावधी पर्यटकांकडून निवडला जातो. नाशिक जिल्ह्य़ात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील परिसर निसर्गरम्य असल्याने सर्वानाच मोहित करतो. पावसाळा आणि त्यांनतरच्या कालावधीत तर हा संपूर्ण परीसर अधिकच खुलून येतो. त्यामुळे नाशिकसह ठाणे, पुणे , मुंबई परीसरातील पर्यटक छोटय़ा सहलींसाठी या कालावधीत मोठय़ा संख्येने येथे भेट देऊ लागले आहेत.

मागील वर्षी उपरोक्त कालावधीत महाराष्टात सर्वाधिक पर्यटकांनी इगतपुरी, त्रंबकेश्वर परिसरास पावसाळी सहलींसाठी प्राधान्य दिले. एरवी पावसाळ्यात ही मंडळी लोणावळा, खंडाळा येथे धावतात. परंतु, करोना संसर्गात मागील वर्षी पुणे जिल्हा आघाडीवर राहिल्याने तिकडे पर्यटकांनी पाठ फिरवली होती. मुंबई, पुण्यापासून इगतपुरी, त्रंबकेश्वर फार दूर नसल्याने पर्यटकांनी या ठिकाणांना प्राधान्य दिले. वारंवार लोणावळा, खंडाळा येथे जाऊन पर्यटक कं टाळले असल्याने इगतपुरी, त्रंबकेश्वरचा सुरक्षित आणि नवीन परिसर त्यांना खुणावत होता. म्हणून मागील वर्षी सर्वाधिक पर्यटक या भागात आले होते. इगतपुरी, त्रंबकेश्वरला हॉटेल, रिसॉर्टसची संख्या बऱ्यापैकी आहे. येथील रिसॉर्टस, हॉटेल हे लोणावळा, खंडाळाप्रमाणे दोन ते तीन किलोमीटरच्या परिसरात नाहीत. येथे साधारणपणे ५०ते ६० किलोमीटरमध्ये राहण्याची व्यवस्था दूरदूर विखुरलेली असल्याने कुठेही एका ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत नाही. तसेच लोणावळा, खंडाळाच्या तुलनेत इकडच्या हॉटेलचे दरही कमी आहेत. यामुळे पर्यटक या निसर्गरम्य भागास पहिली पसंत देऊ लागले आहेत. याचा फायदा या भागातील स्थानिकांनाही होत असल्याचे मागील वेळी दिसून आले. यंदाही पावसाळी सहलींसाठी मोठय़ा प्रमाणावर पर्यटकांनी इगतपुरी, त्र्यंबके श्वरला भेट द्यावी, यासाठी नियोजनाची गरज आहे. जिल्ह्य़ातील करोना रुग्णसंख्याही दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने इगतपुरी आणि त्र्यंबके श्वर तालुक्यात वर्षां सहलीसाठी येणे धोकादायक नसल्याचे पटवून देणे आवश्यक आहे. जर याबाबत योग्य ती खबरदारी घेऊन प्रसिद्धी केल्यास यंदाही पर्यटक मोठय़ा संख्येने इगतपुरी, त्रंबकेश्वर परीसरात हजेरी लावतील.  करोना संकटामुळे हताश

झालेल्या या परिसरातील हॉटेल, रिसॉर्टस आणि पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या इतर व्यावसायिकांना त्याचा लाभ होईल, असा विश्वास ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक दत्ता भालेराव यांनी व्यक्त केला आहे.